शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मध्ये मनरेगातून श्रमिकांना २८५ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:35 IST

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. श्रमिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर आहे, अशी माहिती ‘मनरेगा’ आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा सर्व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी १९ प्रकारच्या कामांसाठी साधारणत: ५ लाख ८७ हजार ३६० कामे तयार ठेवण्यात आली आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधारण, प्रधानमंत्री आवास योजना, जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश आहे. ‘जॉबकार्ड’ असलेल्या मजुरांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या, असे नायक यांनी सांगितले.जलसिंचन विहिरींतर्गत नागपूर विभागात १६९ विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीपोटी १ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च झाला. मनरेगांतर्गत फळबाग योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. विदर्भात १ हजार ४२६ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मजुरी तसेच साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नागपूर विभागात सव्वाचार हजार घरे बांधलीप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून राज्यात २६ हजार ९८४ घरांचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी लाभार्थ्यांना ४७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नागपूर विभागात ४ हजार २६७ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर ७ कोटी ८९ लाख ४३ हजारांचा निधी खर्च झाला आहे. चंद्रपूर (१,०६६), नागपूर (६०५), भंडारा (५३७), गोंदिया (२४१), वर्धा (३३८) व गडचिरोली (४४५) यांचा यात समावेश आहे, असे प्रतिपादन नायक यांनी केले.

टॅग्स :jobनोकरीLabourकामगारGovernmentसरकार