शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आबादी जागेवरील भूखंड वाटपात घोळ?

By admin | Updated: January 4, 2015 00:54 IST

नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल

मनसर : नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनीच केला आहे. यासंदर्भात काहींनी पारशिवनीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. पाली-उमरी पटवारी हलका क्रमांक-४ मधील उमरीतील नवीन आबादी जागेवरील सर्व्हे क्रमांक-३०/१ (आराजी-०.९१ हेक्टर आर.)ची विभागणी करून त्यातील जमिनीचे पट्टे ३० लाभार्थ्यांना वाटप करावयाचे होते. ही वाटप प्रक्रिया १० वर्षांपासून रखडली होती. या जमिनीवर ३० बाय ५०, ३० बाय ३० याप्रमाणे एकूण ३० भूखंड तयार करण्यात आले आणि ते ३० लाभार्थ्यांना वाटायचे होते. यातील नऊ भूखंडाची मागणी नागरिकांनी केली नाही. त्यामुळे सदर नऊ भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. उर्वरित २१ भूखंड नायब तहसीलदार पी. आर. आडे यांच्या आदेशान्वये २०१३-१४ मध्ये वाटण्यात आले. सदर भूखंडाचे वाटप ईश्वर चिठ्ठीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, ते भूखंड रहिवासी प्रयोजनासाठी देण्यात आले होते. या आबादी जमीन भोगाधिकार मूल्य ३० बाय ५० फूट शासकीय कर आकारणी अथवा खंड ३,७८० रुपये चालान क्रमांक-५१ आणि भूखंड क्रमांक-३१, ८३, ६१ चौरस मीटर जमिनीवरील ८३.६१ चौरस मीटर, ९०० चौरस फूट जमिनीवरील कर आकारणी २६ हजार २६८ रुपये चालान क्रमांक-३२ अन्वये एकूण २१ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ही रक्कम दुप्पट असल्याचेही काहींनी सांगितले. सदर रक्कम तत्कालीन तलाठी ढोरे यांच्या तोंडी आदेशान्वये तत्कालीन सरपंच ईश्वर खंगार यांनी वसूल केल्याचा आरोप तहसीलदार तेढे यांना दिलेल्या तक्रारीत लाभार्थ्यांनी केला आहे.शासकीय आबादी जागेवर पाडण्यात आलेल्या भूखंड वाटपात घोळ झाल्याचा आरोपही करण्यात आला. उपासराव केवट, दामोदर खडसे, इंदिरा ठाकरे, प्रल्हाद उकुंडे, राजू शेंडे सर्व रा. उमरी या लाभार्थ्यांना मूळ कर भरणा आकारणीनुुसार ३,७८० रुपये आणि २,२६८ रुपयांच्या ताबा पावती देण्यात आल्या. प्रत्यक्षात या लाभार्थ्यांकडून दुप्पट रक्कम घेण्यात आली, असेही या लाभार्थ्यांनी सांगितले. यासंदर्भात लाभार्थ्यांनी पारशिवनीचे तहसीलदार तेढे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मसराम यांच्याकडे तक्रारी केल्या असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)