शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे समप्रमाणात वाटप करा  :  हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:14 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व प्रयोगशाळांना समप्रमाणात नमुने जातील याचे नियोजन करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांना दिला.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांवर सोपवली जबाबदारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील प्रयोगशाळांना कोरोना रुग्णांचे नमुने वेगवेगळ्या संख्येत पाठविले जात आहेत. काही प्रयोगशाळांना जास्त तर, काही प्रयोगशाळांना कमी संख्येत नमुने मिळत आहेत. त्यामुळे जास्त नमुने गेलेल्या प्रयोगशाळांवर कामाचा ताण येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब लक्षात घेता सर्व प्रयोगशाळांना समप्रमाणात नमुने जातील याचे नियोजन करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांना दिला.सी. एच. शर्मा व सुभाष झंवर यांच्या जनहित याचिकांमध्ये कोरोनाचा विषय हाताळला जात असून त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथील सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारने त्यावर उत्तर देताना यवतमाळ व चंद्रपूर येथे २० मेपर्यंत कोरोना चाचणी सुरू होईल अशी माहिती दिली. हाफकिन इन्स्टिट्यूटने सिंगापूर येथून मशीन बोलावल्या आहेत. त्या आल्यानंतर सर्व ठिकाणी लगेच कोरोना चाचण्या सुरू केल्या जातील. सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटला दोन दिवसामध्ये कोरोना चाचणीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्धा व यवतमाळ येथील नमुने सेवाग्रामला पाठविण्यात येतील अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.राज्य सरकारने नवीन ठिकाणी कोरोना चाचणी कार्यान्वित करण्याची जबाबदारी एम्सवर सोपवली आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात एम्सला प्रतिवादी करण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला. नीरी येथे कोरोना चाचणीची मशीन उपलब्ध आहे. ती मशीन उपयोगात आणण्यासंदर्भात काही निर्णय झाल्यास त्याची माहिती देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड अ‍ॅन्ड कॅलिब्रेशन फॉर लेबॉरेटरीजची मान्यता नसल्यामुळे खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणी मशीन कार्यान्वित नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर केंद्र सरकारने मान्यतेचे प्रस्ताव प्रलंबित असल्यास त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच, राज्य सरकारने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आवश्यकतेनुसार रॅपिड अण्टी बॉडी टेस्ट किटची मागणी केली जाईल असे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने यासाठी सरकारला तीन दिवसाचा वेळ दिला. या प्रकरणावर आता ३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनुप गिल्डा व अ‍ॅड. राम हेडा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या