विहंग सालगट नागपूरदुरांतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नेहमीच अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांना अगोदरच वापरलेले बेड रोल उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु लोकमतच्या पुढाकारानंतर प्रवाशांना या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. लोकमतने केलेल्या तक्रारीवर रेल्वे प्रशासनाने ड्रायक्लिन करणाऱ्या कंपनीवर ११ हजार रुपये दंड ठोठावला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान चालणारी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये स्वच्छतेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. भाडेवाढ मात्र नियमितपणे केली जात आहे. रेल्वेत नेहमीच अस्वच्छता दिसून येते. कधी शौचालय साफ केले जात नाहीत, तर कधी अस्वच्छ बेडरोल स्वच्छ कवरमध्ये पॅक करून प्रवाशांना दिले जाते. परंतु जागरुकते अभावी प्रवाशांना सर्वकाही सहन करावे लागत आहे. यासंबंधात मिळत असलेल्या तक्रारीनंतर लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान यांनी १८ सप्टेंबर रोजी दुरांतो एक्स्प्रेसने नागपूर ते मुंबई प्रवास केला. दरम्यान त्यांना अस्वच्छता तर दिसून आलीच परंतु त्यांना ए-१ कोचमध्ये अस्वच्छ बेड रोल (चादर, उशी, कवर आणि टॉवेल) मिळाले. इतर प्रवाशांना सुद्धा असाच अनुभव आला. अधिक विचारपूस केली असता एका स्वच्छ पॅक केलेल्या कव्हरमध्ये अगोदरच वापरलेले बेड रोड दुसऱ्या प्रवाशाला दिले जात असल्याचे सांगण्यात आले. लोकमतने यासंबंधात केलेल्या तपासात माहिती मिळाली की, बेड रोलच्या साफसफाईचे कंत्राट नांदेडच्या अक्षय ड्राय क्लिनर्सला देण्यात आले आहे. कंपनीतर्फे आपले काम व्यवस्थितपणे पार पाडले जात नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेकडे यासंबंधात दररोज तक्रारी प्राप्त होत आहेत.
दुरांतोमध्ये मळलेली चादर देणे महागात पडले
By admin | Updated: October 18, 2014 02:56 IST