शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीआयएसच्या नोटीसमुळे सराफांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST

नागपूर : सराफांना हॉलमार्किंगचे दागिने विकण्याचे बंधन आल्यानंतर त्यांच्याकडील जुन्या दागिन्यांच्या स्टॉकची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरोने ...

नागपूर : सराफांना हॉलमार्किंगचे दागिने विकण्याचे बंधन आल्यानंतर त्यांच्याकडील जुन्या दागिन्यांच्या स्टॉकची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत ८४१ सराफांना नोटिसा पाठविल्या असून त्यांना ३१ जुलैपर्यंत उत्तर द्यायचे आहे. बीआयएसला नोटिसा पाठविण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत सराफांनी नोटिसाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शासन स्तरावर विरोध करणार असल्याचे सांगितले.

नोटिसाला उत्तर देणार नसल्याचे सराफांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे बीआयएसने स्टॉकची माहिती देणे बंधनकारक असल्याचे नोटिसात म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत सराफांनी माहिती न दिल्यास आणि हॉलमार्किंग नसलेले जुने दागिने सराफांकडे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत बीआयएसने दिले आहेत. त्यामुळे सराफा आणि बीआयएसमध्ये वाद वाढणार आहे.

नोटिसांचा विरोध करणार

हॉलमार्किंगच्या नियमांसाठी स्थानिक स्तरावर बैठका झाल्या आहेत. बीआयएसला माहिती मागण्याचा अधिकार नाही, शिवाय सराफही माहिती न देण्यावर ठाम आहेत. सराफा व्यापारी वजनाच्या हिशेबात स्टॉक ठेवतात. दागिन्यांचा स्टॉक देणे कुणालाही शक्य नाही. देशात ५ लाखांपैकी केवळ ५५ हजार सराफांनी बीआयएसकडे नोंदणी केली आहे. याचप्रकारे नागपुरात ३ हजारांपैकी केवळ ८४१ जणांनी नोंदणी केली आहे. इमानदारीने व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा देण्यात येत असून नोंदणी न करणारे मजेत आहेत.

राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

आदेशानुसार सराफांना नोटिसा

मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार सराफांकडे उपलब्ध जुन्या दागिन्यांचा स्टॉक मागविण्यासाठी सराफांना नोटिसा पाठविण्यास येत आहेत. १२ जुलैला आदेश आल्यानंतर बीआयएसकडे नोंदणीकृत ८४१ सराफांना नोटिसा मेल, व्हॉट्सअ‍ॅप आणि मानक ऑनलाईन पोर्टलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. नोटिसाचे उत्तर ३१ जुलैपर्यंत पाठवायचे आहे. उत्तर न दिलेल्या सराफांवर कारवाई होणार वा नाही, हे नंतरच कळणार आहे. आम्ही मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत.

विजय नितनवरे, वैज्ञानिक-ई अ‍ॅण्ड प्रमुख, बीआयएस.