शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विघ्नहर्त्याचे दर्शन ऑनलाईनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतींचे दर्शन ऑनलाईनच करता येईल. मंडपात जाऊन कुणालाही दर्शन घेता येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतींचे दर्शन ऑनलाईनच करता येईल. मंडपात जाऊन कुणालाही दर्शन घेता येणार नाही. या नियमांचे कठोरपणे पालन व्हावे, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.

१० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे साार्वजनिक गणपतींची स्थापना होऊ शकली नाही. नागरिकांनीसुद्धा निर्बंधांचे पालन करत गणेशोत्सव साजरा केला. कोरोनाचे संक्रमण करीत झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. प्रशासनाच्या दृष्टीने मात्र हे दिवस धोक्याचे आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, जवळपास ९०० ठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार आहे. पोलीस, एसआरपी आणि होमगार्ड जवान, अधिकाऱ्यांसह ४ हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तांना ऑनलाईन किंवा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून विघ्नहर्त्याचे दर्शन घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. भक्तांना मंडपात उभे राहून दर्शन घेता येणार नाही. पूजा किंवा अन्य आवश्यक कामासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडपात जाता येईल. त्यांनासुद्धा मास्क व इतर आवश्यक उपाय करणे बंधनकारक राहील.

कृत्रिम टॅंकमध्येच विसर्जन करा

मूर्ती खरेदी करणे, स्थापना करणे किंवा विसर्जन करण्यासाठी लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाता येणार नाही. जे लोक राहतील तेसुद्धा कमीत कमी राहतील. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कृत्रिम टॅंकमध्येच गणपतीचे विसर्जन करावे. महापालिकेतर्फे कृत्रिम टॅंक तयार करण्यात आले आहेत. कोरोना संक्रमण राेखण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने कठोर व्हावे लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.