शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विघ्नहर्त्याच्या मूर्ती व्यवसायावर विघ्न; मूर्तीकारांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:00 IST

सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे.

ठळक मुद्देअजूनपर्यंत ऑर्डर्स नाहीत

धीरज शुक्लालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीगणेशोत्सवास २२ ऑगस्टपासून प्रारंभ होतो आहे. तरीदेखील या उत्सवाच्या भव्यदिव्यतेवर संभ्रम संपलेला नाही. मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांना उत्सवाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे तर मुर्तीकारांना मूर्तीच्या ऑर्डर्सची. कोविड-१९च्या संकटात विघ्नहर्त्याप्रति आस्थेचा भाव असणाऱ्यांना भक्तांना देवाच्या कृपेची आशा आहे आणि हा पर्व जल्लोषात साजरा होईल, अशी अपेक्षा आहे.श्रीगणेशाच्या मूर्ती बनविणाऱ्यांकडे कायम वर्दळ असणाऱ्या चितारओळीमध्ये कोरोनामुळे नीरव शांतता पसरली आहे. सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे. मूर्तीकार मूर्ती बनवतील अशी अपेक्षा आयोजकांमध्ये आहे तर आयोजक परवानगी घेऊन ऑर्डर देतील अशी अपेक्षा मुर्तीकारांना आहे.

त्याच अनुषंगाने काही आयोजक मनपा प्रशासनाकडून उत्सवाची परवानगी घेण्यासाठी पोहोचलेही होते. मात्र, परवानगी २१ दिवस आधी म्हणजेच १ ऑगस्टला मिळेल असे सांगून त्यांना माघारी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे मुर्तीकारांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. जर अशा तºहेने परवानगी दिली आणि आयोजकांनी त्यानंतर ऑर्डर दिली तर मोठ्या परिश्रमानेही एवढ्या कमी वेळेत केवळ दोन ते चारच मूर्ती आकार घेऊ शकणार असल्याचे मूर्तीकार सांगतात. जर असेच झाले तर वर्षभराचा रहाटगाडा कसा चालेल? आणि याच क्षेत्रात ऐन व्यवसायाच्या काळात कोरोना संक्रमित आढळला तर व्यवसाय आणि परिश्रम दोन्हीचा सत्यानाश होईल, अशी भिती मुर्तीकारांमध्ये निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीच तयारी दिसून येत नाही.महागाई वाढली, भाड्याचा भारही डोक्यावर!: या काळात मुर्तीकार दुहेरी संकटात सापडले आहे. मूर्ती बनविण्यात उपयोगात येणारी माती, बारदाना, लाकूड आणि रंगाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे, हा कच्चा माल ३० ते ४० टक्के महाग घेतला जात आहे. काही मुर्तीकारांनी ५० ते एक लाख रुपये प्रमाणे दुकाने भाड्याने घेतले आहे. मात्र, मूर्तींसाठीचे ऑर्डर्स येत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा स्थितीत भाडे द्यायचे की मूर्तीचे साहित्य आणायचे, अशी विवंचना आहे. तुर्तास चार फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी भंडारा, यवतमाळ, छिंदवाडा आदी ठिाकाणांहून माती मागवली जात आहे.पीओपीची गाडी अजूनही सुसाट सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाने काहीच दिवसांपूर्वी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले होते तरी देखील शहरात या मूर्ती येत आहेत. अमरावती, काटोल, वरूड आदी ठिकाणांहून या मूर्ती शहरात पोहोचत आहेत.सरकारने धोरण स्पष्ट करावे - चंद्रशेखर बिंड रामनवमी उत्सवासाठी मूर्ती बनविणाºया मूतीर्कारांना ऐनवेळी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. श्रीगणेशोत्सवासाठी आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे, सरकारने आपले धोरण स्पष्ट केल्यावरच मोठ्या मूर्तींच्या निमार्णासंदर्भात आपले धोरण स्पष्ट करणे अपेक्षित असल्याची भावना सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर बिंड यांनी व्यक्त केली.वर्षभराच्या अपेक्षेवर फेरले पाणी - विजय तायवाडे मूतीर्कारांना वर्षभर श्रीगणेशोत्सवाची प्रतिक्षा असते. मूर्तींच्या भरवशावरच मूतीर्कारांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह होत असते. मात्र, परवानगी संदर्भात कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याने आमच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेल्याचे सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे सचिव विजय तायवाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव