शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आयटीआय प्रवेशाचा वाद हायकोर्टात

By admin | Updated: August 24, 2016 02:38 IST

उत्तर अंबाझरी रोडस्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ‘इन्फर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

१४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हाननागपूर : उत्तर अंबाझरी रोडस्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ‘इन्फर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड सिस्टीम मेंटेनन्स’ या पदविका अभ्यासक्रमातील १४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयाला निर्भय खेडीकर या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणावर उद्या, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.याचिकेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. संचालनालयाने शासकीय व खासगी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांतील प्रवेशाकरिता २२ जून २०१६ रोजी अधिसूचना जारी केली होती. यानंतर १६ आॅगस्ट २०१६ रोजी निर्भयसह १४८ विद्यार्थ्यांचे ‘इन्फर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड सिस्टीम मेंटेनन्स’ या पदविका अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालय शुल्क, गणवेश शुल्क व इतर शैक्षणिक शुल्क संस्थेत जमा करण्यास सांगण्यात आले. तसेच, १८ आॅगस्टपासून वर्ग घेण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या अभ्यासक्रमात प्रवेश न मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी तक्रारी करून प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेतला. यामुळे संचालनालयाने वादग्रस्त आदेश जारी करून सर्व १४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले व नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेत. हा आदेश जारी करण्यापूर्वी कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. परिणामी वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा व नवीन प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्या निर्भयला दहावीत ६२ टक्के गुण असून त्याने प्रवेशाकरिता १४ आॅगस्ट २०१६ रोजी आॅनलाईन अर्ज सादर केला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. कार्तिक पटेल कामकाज पाहणार आहेत.(प्रतिनिधी)