शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अखेर संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 14:24 IST

मागील अनेक दिवसांपासून रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू होता. पक्षामध्ये दोन शहराध्यक्ष स्वतंत्रपणे वावरत होते. परंतु शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा वाद कायमचा संपुष्टात आला.

ठळक मुद्देबाळू घरडे शहराध्यक्ष, राजन वाघमारे विदर्भ प्रवक्ते

आॅनलाईन लोकमतनागपूर : मागील अनेक दिवसांपासून रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू होता. पक्षामध्ये दोन शहराध्यक्ष स्वतंत्रपणे वावरत होते. परंतु शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा वाद कायमचा संपुष्टात आला. या बैठकीत नागपूर शहर अध्यक्ष म्हणून बाळू घरडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर राजन वाघमारे यांच्याकडे विदर्भ प्रवक्तेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदाबाबत सुरुवातीपासूनच वाद सुरू होता. बाळू घरडे व राजन वाघमारे हे दोघेही या पदासाठी इच्छुक होते. प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी राजन वाघमारे यांची शहराध्यक्ष म्हणून निवड केली होती. तेव्हा बाळू घरडे यांनी या निवडीवर आक्षेप घेतला होता. ही निवड नियमबाह्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मध्यंतरी घरडे यांनी शक्तिप्रदर्शन करीत शहरातील कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली होती. त्या बैठकीत थेट प्रदेशाध्यक्ष हटविण्याची मागणी केली होती. हा वाद राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोहोचला होता. दरम्यानच्या काळात वाघमारे आणि घरडे हे दोघेही स्वतंत्रपणे शहर अध्यक्ष म्हणूनच वावरत होते. दोन पदाधिकाऱ्यांमधील वादामुळे कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत होत होती.अखेर प्रदेशाध्यक्ष थुलकर यांनी शुक्रवारच्या बैठकीत हा वाद संपुष्टात आणला. शहर अध्यक्ष म्हणून बाळू घरडे यांच्या नावाची घोषणा केली. तसेच राजन वाघमारे यांच्याकडे विदर्भ प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविली. याशिवाय त्यांच्याकडे आणखी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. इतर पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच केली जाणार आहे.बैठकीत भूपेश थुलकर यांच्यासह राजन वाघमारे, आर.एस. वानखेडे, बाळू घरडे, भीमराव कांबळे, राजू बहादुरे, डॉ. मनोज मेश्राम, विनोद थुल आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण