शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये संघाविरोधात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’च्या आयोजनाची मागणी संघाने फेटाळून लावली. या मुद्यावरून मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये नाराजीचा सूर आहे. मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांनी तर संघाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे.

ठळक मुद्दे‘इफ्तार’ला नकार दिल्याचा मुद्दा : इंद्रेश कुमार यांच्याकडे व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’च्या आयोजनाची मागणी संघाने फेटाळून लावली. या मुद्यावरून मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये नाराजीचा सूर आहे. मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांनी तर संघाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे.मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. शहरात इतर ठिकाणी मंचतर्फे ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले. मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. संघाबाबत मुस्लीम समाजात नकारात्मक भावना आहे. ती दूर करण्यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही काम करतो आहे. सामाजिक समरसता वाढावी यासाठी मागील दोन महिन्यांपासून आम्ही स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन व्हावे, यासाठी प्रयत्न करत होतो. यासाठी निवेदनदेखील सादर केले होते. मात्र आम्हाला नकारच मिळाला, असे प्रतिपादन मोहम्मद फारुक शेख यांनी केले.मुस्लीम का जुळू शकत नाहीत ?संघाशी बौद्ध, जैन, शीख समाजाचे लोक जुळले आहेत. मुस्लीम समाजातील लोकांमधील पूर्वग्रह दूर करून त्यांना संघाकडे आणण्यासाठी आम्ही कार्य करतो आहे. यामुळे सामाजिक एकतादेखील वाढीस लागेल. जर बाकीचे लोक संघाशी जुळू शकतात, तर मुस्लीम का नाही, असा प्रश्न मोहम्मद फारुक शेख यांनी उपस्थित केला. एक कार्यकर्ता या नात्यानेच मी संघाकडे आपला हक्क मागितला होता. इंद्रेश कुमार यांना याबाबत कळविले असून त्यांनी २० जून रोजी होणाऱ्या मंचच्या राष्ट्रीय बैठकीत हा मुद्दा ठेवण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुस्लीम राष्ट्रीय मंचने संघ मुख्यालय किंवा स्मृतिमंदिर येथे ‘इफ्तार’साठी कुठलीही परवानगी मागितली नसल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संघटन संयोजक विराग पाचपोर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :RamzanरमजानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ