शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

चित्रांचे प्रदर्शन हे दुकान नव्हे  : वासुदेव कामथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:35 IST

चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले.

ठळक मुद्देकला क्षेत्रातील व्यावसायिक अभावाच्या कारणांचा केला ऊहापोह

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चित्रकारांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्या तुलनेत त्यांना व्यावसायिक यश का लाभत नाही, असा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारला जातो. याची अनेक कारण आहेत. परंतु प्रमुख कारण म्हणजे,बहुतेक चित्रकार कुंचला हातात घेता बरोबर हे चित्र कितीत विकले जाईल याचा विचार करतात. याच विचारातून पुढे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. परंतु असे चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत गुरुवारी आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले असता ते लोकमतशी बोलत होते. या चर्चेत त्यांनी कला क्षेत्रातील व्यावसायिक अभावाच्या अनेक कारणांचा ऊहापोह केला. कामथ म्हणाले, चित्र प्रदर्शनाचे आयोजन सातत्याने व्हायला हवे. कुठल्याही कलावंताने आपली चित्रे शंभर ठिकाणी घेऊन फिरण्यापेक्षा अशा प्रदर्शनात ती लावावी जेणेकरून शंभर ठिकाणची माणसे ती चित्रे बघायला तुमच्याजवळ येतील. आपल्या कलेला सर्वदूर पोहोचविण्यासाठी हा जास्त सन्मानजनक पर्याय आहे. पण, अशा प्रदर्शनात आपले चित्र विकले गेलेच पाहिजे असा हट्ट धरू नका. चित्र विकल्याजाण्याआधी ते पाहणाऱ्याला कसे आवडेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपले चित्र दुसऱ्याच्या भिंतीवर त्याच्या आवडीने कसे लावले जाऊ शकेल याचा विचार करतानाच त्याचा गुणात्मक दर्जा कसा वाढवता येईल याकडे आपले लक्ष असायला हवे. चित्र नजरेला चांगले वाटणे आणि त्या चित्राने थेट हृदयाला साद घालणे या दोन वेगळया गोष्टी आहेत. पण, दुर्दैवाने ही तफावत कुणी गंभीरतेने लक्षात घेताना दिसत नाही. इथेच आपण चुकतो आणि चित्रांना किंमत मिळत नाही, असे सांगत सुटतो. तुमचे चित्र हृदयाला साद घालणारे असेल तर या तक्रारीला जागाच उरणार नाही, याकडेही कामथ यांनी लक्ष वेधले.कलावंत संवेदनशीलच हवाबहुतेकांची चित्रे अजूनही रंजनवादाच्या पलीकडे जाऊन सभोवतालचे विदारक वास्तव मांडायला धजावत नाहीत, अशीही टीका होत असते. पण, प्रत्येक कलावंताचा पिंड वेगळा असतो. चित्राचा विषय हा अनेकदा तत्कालीन स्थितीवर अवलंबून असतो. कलावंत संवेदनशील मनाचा असेल तर त्याच्या कॅनव्हॉसवर वास्तवच रेखाटले जाईल. ते कुणीही थांबवू शकत नाही.

टॅग्स :paintingचित्रकलाJawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी