शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना ‘दे धक्का’

By admin | Updated: June 24, 2016 02:58 IST

‘एफटीआयआय’च्या (फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ) वादाचे केंद्रबिंदू ठरलेले

वसतिगृहात तीन वर्षांहून अधिक राहता येणार नाही : गजेंद्र चौहान यांची स्पष्टोक्ती, सरसंघचालकांची घेतली भेटनागपूर : ‘एफटीआयआय’च्या (फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ) वादाचे केंद्रबिंदू ठरलेले अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘एफटीआयआय’च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. चौहान यांच्या या वक्तव्यामुळे ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत.‘एफटीआयआय’मध्ये तीन वर्षांचा ‘सेमिस्टर’ प्रणालीचा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी आहे. त्यानंतर विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत, तर एक वर्ष वाढवून दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच तीन वर्षांचे शुल्क घेतो. त्यामुळे वाढविलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहता येणार नाही. याबाबत विद्वत्त परिषदेमध्ये निर्णय झाला आहे. आता प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे चौहान यांनी प्रतिपादन केले.दरम्यान, गुरुवारी सकाळी गजेंद्र चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. ‘एफटीआयआय’च्या वादानंतर त्यांनी प्रथमच संघ मुख्यालयाला भेट दिली. याबाबत विचारणा केली असता सरसंघचालक मला पित्यासारखे आहेत, त्यामुळेच मुलाच्या लग्नाचे पहिले आमंत्रण सरसंघचालकांना देण्यासाठी आलो असल्याचे चौहान यांनी सांगितले.(प्रतिनिधी)संघाने माझी नियुक्ती केलेली नाही‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. हे आंदोलन बरेच पेटले होते व यावरून देशातील राजकारणदेखील तापले होते. संघाशी जवळीक असल्यामुळेच चौहान यांची नियुक्ती झाल्याचे आरोप झाले होते. याबाबत चौहान यांना विचारणा केली असता, संघाने माझी नियुक्ती केलेली नाही, असे म्हणत या मुद्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले.