शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
3
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
4
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
5
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
6
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
7
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
8
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
9
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
10
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
11
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
12
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
13
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
14
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
15
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
16
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
17
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
18
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
19
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
20
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?

संग्रहाच्या छंदातून शोधला जगण्याचा विरंगुळा

By admin | Updated: May 18, 2014 00:57 IST

कधीकाळी मुलाबाळांनी गजबजलेल घर व त्यात नांदणारा आनंद, मुले मोठी होऊन नोकरीनिमित्त बाहेरगावी गेल्यावर हिरावल्या जातो. घर ओस पडते, आईवडिलांनाही एकटेपणा जाणवतो.

आज जागतिक संग्रहालय दिन : आनंद अनुभवताहेत वयोवृद्ध

नागपूर : कधीकाळी मुलाबाळांनी गजबजलेल घर व त्यात नांदणारा आनंद, मुले मोठी होऊन नोकरीनिमित्त बाहेरगावी गेल्यावर हिरावल्या जातो. घर ओस पडते, आईवडिलांनाही एकटेपणा जाणवतो. यातून मार्ग शोधण्यासाठी काही वृद्धांनी संग्रहाला माध्यम केले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील हरविलेला आनंद परत आला आहे. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त रमण विज्ञान केंद्रात संग्राहकांचे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेले बहुतांश संग्राहक वयोवृद्ध आहेत. यातील काहींना संग्रहाची पूर्वीपासून आवड होती, मात्र निवृत्तीनंतर त्यांनी संग्रहाला वेगळा आयाम दिला. या प्रदर्शनातील प्रत्येक वयोवृद्धांचे त्यांच्या घरी स्वत:चे संग्रहालय आहे. यातून ते जगण्याचा आनंद लुटत असले तरी, यात इतिहास लपला आहे. जो आजच्या पिढीला अवगत नाही. प्रदर्शनात सहभागी झालेल्या ६५ वर्षीय अनिता सारडे यांनी देशभरातील महत्त्वाच्या स्थळाची माती संग्रही केली आहे. प्रत्येक प्रदेशातील मातीचे वैशिष्ट्य त्यांनी संग्रहातून मांडले आहे. यात कारगीलच्या युद्धभूमीची मातीसुद्धा आहे. त्याचबरोबर शंखशिंपले, विविध आकाराच्या आणि रंगाच्या पणत्या. सचिन तेंडुलकरचे हजारो चित्र त्यांच्या संग्रहात आहे. एअरपोर्ट येथून निवृत्त झालेले लक्ष्मण लोखंडे यांना आॅटोग्राफचा छंद आहे. अडीचशेच्यावर आॅटोग्राफ त्यांच्या संग्रही आहे. आजही ते सिनेअभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, राजकीय नेते, प्रसिद्ध साहित्यिक यांचा आॅटोग्राफ घेण्यासाठी धडपडताना बघून आश्चर्य होते. ६८ वर्षाचे गंगाधर अडसडसुद्धा शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहे. निवृत्तीनंतरचा त्यांचा वेळ नाण्यांचे कलेक्शन करण्यात जात आहे. त्यांनी घरीच २००० चौरस फुटात आपले संग्रहालय तयार केले आहे. यांच्यासारख्या छंदिष्ट वयोवृद्धांना छंदवैभवने प्लॅटफॉर्म दिला आहे. त्यांचा संग्रह प्रदर्शनातून मांडून, लहानग्यामध्ये संग्रहाची आवड निर्माण करण्यासाठी आणि वयोवृद्धांना जगण्यातील आनंद शोधण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. (प्रतिनिधी) खरा आनंद उपभोगत आहे १२ वेगवेगळ्या वस्तूंचा छंद जोपासणार्‍या अनिता सारडे यांच्यावर घरचीही जबाबदारी आहे. मि. सारडे आणि मुलांचे करता करता दिवस जातो. तरीही कामातून वेळ काढून छंद जोपासते. घरचे याला वेडेपणा म्हणत असले तरी, मला समाधान, आनंद मिळत आहे. त्यामुळे मी नेहमीच प्रसन्न राहते. तरुणपणापेक्षा जास्त उत्साह विवेक ओबेरॉयचा आॅटोग्राफ घेण्यासाठी तब्बल अडीच तास वाट पहावी लागली. त्याच्याभोवती अतिशय गर्दी होती. तरीही तरुणासारखा मार्ग शोधत त्याचा आॅटोग्राफ घेतला. सेवानिवृत्तीनंतर माझ्या छंद बहरला आहे. माझ्यातील उत्साह तरुणपणापेक्षा जास्त असल्याचे लक्ष्मण लोखंडे म्हणाले. संग्राहकाचे आयुष्य वाढते आनंददायी जीवनाचा मार्ग छंद आहे. आपल्या छंदात व्यस्त असल्याने, मानसिक आरोग्य सृदृढ राहते. कल्पनाशक्ती वाढते. म्हातारपणी कुटुंबाच्या विचारांमुळे आरोग्य ढासळते. छंद जोपासल्यास विचाराला वेळच मिळत नाही. त्यामुळे संग्रहकाचे आरोग्य सृदृढ राहत असून, आयुष्यमान वाढते. -जयंत खेडेकर, सचिव, छंदवैभव