शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीएम केअर फंडमधील रकमेची माहिती जाहीर करा; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:21 IST

पीएम केअर फंडमध्ये आतापर्यंत जमा झालेल्या रकमेची माहिती जाहीर करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह अ­ॅड. अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देकोरोना संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पीएम केअर फंडमध्ये आतापर्यंत जमा झालेल्या रकमेची माहिती जाहीर करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह अ­ॅड. अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.या फंडमध्ये देश-विदेशातील सामान्य व्यक्तीपासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी आपापल्या शक्तीनुसार दान दिले आहे. टाटा समूहाने १५०० कोटी तर, अजीम प्रेमजी फाऊंडेशनने १२२५ कोटी रुपये दान केले आहेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटना, एशियन डेव्हलपमेंट बँक आदींनीही कोट्यवधी रुपये दिले आहेत. परंतु, फंडमध्ये आतापर्यंत किती रक्कम जमा झाली याची माहिती सरकारने जाहीर केली नाही. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्याची गरज आहे. तसेच, फंडमधील जमाखर्चाचे कॅगमार्फत आॅडिट केले गेले पाहिजे. तसे न केल्यास या घटनात्मक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.विश्वस्तांची पदे तातडीने भरापंतप्रधान हे या फंडचे अध्यक्ष तर, केंद्रीय संरक्षण मंत्री, गृहमंत्री व वित्तमंत्री विश्वस्त आहेत. याशिवाय ट्रस्टच्या घटनेनुसार, तीन विश्वस्त आरोग्य, विज्ञान, विधी, कॉर्पोरेट इत्यादी प्रमुख क्षेत्रांमधून अनुभव व पात्रता निकषांच्या पूर्ततेनंतर भरायचे होते. परंतु, एक महिन्यावर कालावधी संपूनही या नियुक्त्या झाल्या नाहीत. जनहित लक्षात घेता यासंदर्भात तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच, तीनपैकी दोन विश्वस्त देशातील प्रमुख विरोधी पक्षांमधून नियुक्त करावेत असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय