शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीत एसडीआरएफच्या जवानांचे मदतकार्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपत्तीमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ)ची भूमिका महत्त्वाची असते. आपत्ती आली तर अडकलेल्या जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपत्तीमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ)ची भूमिका महत्त्वाची असते. आपत्ती आली तर अडकलेल्या जखमी व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे व त्यांना स्थिर करून सुरक्षितरित्या घटनास्थळातून बाहेर काढणे, त्यांच्यावर प्रथमोपचार करणे तसेच पूरपरिस्थितीत पूर व अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना शोधून काढणे, उंच इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांचा बचाव करणे, भूकंपग्रस्त इमारतीमधील धोका दूर करून यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना शोधणे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्वरित वैद्यकीय उपचारासाठी कशी मदत केली जाते, याचे प्रात्यक्षिक सोमवारी एसडीआरएफने करून दाखविले. निमित्त होते. फिल्ड क्राफ्ट ट्रॉफी स्पर्धेचे.

राज्य आपत्ती प्रतिसाद पथक महाराष्ट्र यांच्यामार्फत २०१६ पासून फिल्ड क्राफ्ट ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी या स्पर्धेची सुरुवात राज्य राखीव पोलीस दल, हिंगणा रोड येथे झाली.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल, मुख्यालय येथे उपमहानिरीक्षक महेश घुर्ये यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक प्रमोद लोखंडे व त्यांच्या चमूने उत्कृष्टरित्या प्रात्यक्षिकांद्वारे क्राफ्ट ट्रॉफी स्पर्धा-२०२१ चे सादरीकरण केले. प्रात्यक्षिकांचे मूल्यांकन राज्य राखीव बल गट क्र. १३ चे समादेशक डॉ. पवन बन्सोड, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे उप समादेशक कमलेश डौनिडयाल, निरीक्षक महेंद्र कुमार, अमित कुमार यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अंकुश गावंडे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४, १३ व १५ तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर कार्यालयातील पोलीस अधिकारी, अमलदार व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.