शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना सार्वजनिक कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा, राज्याचा आराखडा आणि जिल्ह्यास्तरीय आराखडा तयार करण्याची तरतूद ...

नागपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा, राज्याचा आराखडा आणि जिल्ह्यास्तरीय आराखडा तयार करण्याची तरतूद आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी केले.

संविधान फाऊंडेशनच्या ‘संविधानाची शाळा’ उपक्रमांतर्गत रविवारी ‘संविधानाच्या परिप्रेक्ष्यातून आपत्ती व्यवस्थापन कायदा’ या विषयावर अ‍ॅड. मिर्झा यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापन कायदा केवळ नागरिकांसाठी नाही तर, तो राबवणाऱ्यांसाठीसुद्धा आहे. परंतु, दुर्दैवाने आपल्या सरकारजवळ कोणताही आराखडा दिसून आला नाही. सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केल्यास संपूर्ण देश संकटात येईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे असे अ‍ॅड. मिर्झा यांनी सांगितले.

कोरोनासारखे विषाणू जात-धर्म पहात नाही. मग, आपण सरकार निवडताना जात-धर्माचा विचार का करतो? आपण नेहमी राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या व्यक्तीची निवड केली पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, या तत्त्वाचे पालन व्हायला पाहिजे. या महामारीच्या काळातही भ्रष्टाचार आणि शोषण करण्याचे वर्तन राज्यघटनेचा अवमान आहे असे मतही अ‍ॅड़ मिर्झा यांनी व्यक्त केले. प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी अ‍ॅड. मिर्झा यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे आदी उपस्थित होते.