शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांचे महामंडळच झाले ‘अपंग’

By admin | Updated: September 24, 2015 03:30 IST

वर्षभरापूर्वी राज्यात नंबर एकवर असलेले अपंग वित्त विकास महामंडळ अधिकाऱ्यांअभावी ‘अपंग’ झाले आहे.

अपंगांचे महामंडळच झाले ‘अपंग’ नागपूर : वर्षभरापूर्वी राज्यात नंबर एकवर असलेले अपंग वित्त विकास महामंडळ अधिकाऱ्यांअभावी ‘अपंग’ झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून महामंडळाचा कारभार ठप्प पडला आहे. एकाही अपंगाच्या कर्ज प्रस्तावाला तीन महिन्यापासून मंजुरी मिळालेली नाही. विशेष म्हणजे या महामंडळाचे अध्यक्ष समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले आहेत. असे असतानाही अपंगांच्या पुनर्वसनाच्या यंत्रणेला खीळ बसत आहे. अपंगांचा सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. इतर महामंडळाच्या तुलनेत अपंग महामंडळ कार्य लक्षात घेता महामंडळ गेल्या काही वर्षात अग्रस्थानी राहिले आहे. राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री झाल्यानंतर त्यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांच्याकडून महामंडळाचा कार्यभार काढून घेतला. तसेच महामंडळाचे नागपूर विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक गजानन वाघ यांना स्वीय सहायक बनवून घेतले. या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांमुळे महामंडळ अनाथ झाल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यापासून महामंडळाचे कामकाज ठप्प आहे. एकाही अपंगाच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. कर्जवसुली ठप्प पडली आहे. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांनी अपंगाची कर्ज प्रकरणे स्वीकारण्यास नकार दिला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहे. अपंगांचे पुनर्वसन ठप्प पडले आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांनी महामंडळाला खऱ्या अर्थाने विकसित केले. २००८-०९ मध्ये महामंडळाचे राज्यभरात केवळ ७४ लाभार्थी होते. त्यांना ७६ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. २००९-१० मध्ये काळे यानी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यभार स्विकारला. त्यांच्या काळात ७४ लाखावरून हे महामंडळ १४ कोटीवर गेले. २०१३-१४ मध्ये १२६६ लाभार्थ्यांनी महामंडळाच्या सुविधेचा लाभ घेतला. महामंडळाच्या माध्यमातून अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन नागपुरात यशस्वीरीत्या पार पडले. (प्रतिनिधी)