शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगाचे लसीकरण केंद्र शनिवार, रविवारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:06 IST

संतापलेले दिव्यांगजन परतले घरी नागपूर : शनिवार व रविवारी दिव्यांगांचे लसीकरण केंद्र बंद असल्याने, लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचलेल्या अनेक ...

संतापलेले दिव्यांगजन परतले घरी

नागपूर : शनिवार व रविवारी दिव्यांगांचे लसीकरण केंद्र बंद असल्याने, लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचलेल्या अनेक दिव्यांगांना संताप व्यक्त करून परतावे लागले. सामान्यांचे लसीकरण केंद्र शनिवार, रविवार सुरू ठेवण्यात येते मग दिव्यांगांचे लसीकरण केंद्र शनिवारी आणि रविवारी बंद का, असा सवाल दिव्यांग संघटनांनी केला आहे.

नागपूर महापालिकेने दिव्यांगांसाठी शहरात स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारले. यशवंत स्टेडियम येथील सीआरसी सेंटरमध्ये लसीकरण सुरू झाले. हे दिव्यांगांचे एकमेव लसीकरण केंद्र आहे. सामान्यांच्या केंद्रामध्ये होत असलेल्या गर्दीमुळे दिव्यांगांचे लसीकरण अवघड जाते. त्यामुळे शहरात राहणारे दिव्यांगजण यशवंत स्टेडियम येथील सीआरसी सेंटरला येऊन लसीकरण करतात. शनिवार व रविवारी नोकरी करणारे दिव्यांग कर्मचारी कुटुंबासह लसीकरणासाठी येतात. सीआरसी सेंटर हे दिव्यांगांच्या आरोग्य, रोजगार, सर्वांगीण विकास व पुनर्वसनासाठी चालविण्यात येते. परंतु ह्या केंद्राला शनिवार व रविवारी सुटी असते. त्यामुळे लसीकरणही बंद असते. नोकरीपेशा दिव्यांगांना शनिवार व रविवार सोयीस्कर असल्याने हे केंद्र सुरू ठेवावे, अशी मागणी डिसेबिलिटी राईट्स अ‍ॅक्टीव्हीस्ट वर्मा तेलंग यांनी केली आहे.