योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे कार्यकर्ते जोडण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न सुरू आहेत. एकाच ‘प्लॅटफॉर्म’वरून पक्षाची धोरणे कळावीत तसेच उपक्रम व कार्यक्रम यांची अगोदरच सूचना मिळावी यासाठी ‘आयटी सेल’तर्फे विशेष पुढाकार घेण्यात येणार आहे. शहर भाजपाचे नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ ‘अपडेट’ करण्यात येणार असून कार्यकर्त्यांसमवेत नेते थेट त्यांच्या कार्यालयातूनच ‘डिजिटली कनेक्ट’ होऊ शकणार आहेत. सोबतच शहर भाजपचे अधिकृत ‘टिष्ट्वटर’खातेदेखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकांमध्ये विजयाची ‘हॅटट्रीक’ केल्यानंतर पुढील निवडणुकांसाठी शहर भाजपची तयारी सुरू आहे. पक्षाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ही माहिती एका ‘प्लॅटफॉर्म’वर उपलब्ध होत नसल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आपापल्या स्तरावर प्रचार-प्रसाराचे प्रयत्न करण्यात येतात. ही गोष्ट डोळ््यासमोर ठेवून नव्याने तयार करण्यात आलेल्या शहर भाजपच्या संकेतस्थळाला ‘अपडेट’ करण्याची पक्षाची योजना आहे. या माध्यमातून शहरातील मोठे नेते व पदाधिकारी यांच्या कार्यालयाशी संकेतस्थळाची ‘लिंक’ जोडण्यात येईल. संबंधितांच्या प्रभागात किंवा कार्यक्षेत्रात एखादा कार्यक्रम झाला की त्याची माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ तत्काळ त्यांच्या कार्यालयातूनच संकेतस्थळावर ‘अपलोड’ करता येतील, अशी सुविधा देण्यात येणार आहे. सोबतच ‘सोशल मीडिया’वर संबंधित माहिती ‘शेअर’ करण्यासाठी विशेष ‘लिंक’देखील राहणार आहे. यामुळे शहरातील सर्व प्रभागांमधील कार्यकर्ते व पदाधिकाºयांपर्यंत माहिती पोहोचणे सोईचे होणार आहे.‘आॅनलाईन’च जाणार निरोपशहर भाजपतर्फे विविध उपक्रम-बैठकांचे आयोजन सुरूच असते. या बैठकांसाठी निरोपदेखील आता ‘डिजिटल’ पद्धतीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोण कोण पदाधिकारी आले होते, याची नोंददेखील यामुळे ठेवणे सोपे जाणार आहे. महत्त्वाच्या बैठकांचा तपशीलदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पक्षविस्तारासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग२०१४ च्या निवडणुकांनंतर राजकारणात तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला आहे. त्यामुळेच संकेतस्थळ नव्याने ‘डिझाईन’ करण्यात येत असून मंडळ अध्यक्षांपासून सर्व मोठे नेते व पदाधिकाºयांशी कार्यकर्ते थेट संपर्क करू शकतील, यावर भर देण्यात येत आहे. एकाच ‘प्लॅटफॉर्म’वर एकत्रित माहिती उपलब्ध होणार असून तंत्रज्ञानाचा पक्षविस्तारासाठी उपयोग करण्याची आमची भूमिका आहे, अशी माहिती शहर भाजपच्या ‘आयटी सेल’चे प्रमुख केतन मोहितकर यांनी दिली. शहर भाजपचे अधिकृत ‘टिष्ट्वटर’ खातेदेखील लवकरच सुरू होईल व या माध्यमातून ‘अपडेट्स’ टाकण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांशी भाजप नेते होणार ‘डिजिटली कनेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:01 AM
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे कार्यकर्ते जोडण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न सुरू आहेत.
ठळक मुद्देपक्षविस्तारासाठी संकेतस्थळ ‘अपडेट’ करणार : बैठका-उपक्रमांची माहिती एका ‘क्लिक’वर