शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिवल : शहर पोलिसांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 01:40 IST

कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोरोनापासून बचाव करण्याची संकल्पना : प्रतिभावंतांना मिळणार पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.संबंधितांनी एक ते दोन मिनिटाची डिजिटल शॉर्ट फिल्म बनवून ती पोलिसांकडे पाठवायची आहे. सोशल डिस्टन्स हा याचा विषय आहे.अनेक गोष्टी वारंवार सांगूनही त्या लक्षात राहत नाहीत. याउलट एखादी चित्र अथवा व्हिडिओ बघून नागरिकांच्या मनावर त्याचा प्रभावी परिणाम होतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्स किती महत्त्वपूर्ण आहे, ते पटवून देण्यासाठी या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित कलावंत सोशल डिस्टन्स या विषयावर एक ते दोन मिनिटाची व्हिडीओ क्लिप बनवून ती 'एनजीपीपोलीसएसएफ@जीमेल डॉटकॉम' वर पाठवू शकतात. १६ ते २२ मे पर्यंत पाठविण्यात येणाऱ्या शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी विचारात घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी ती शॉर्ट फिल्म अथवा व्हिडीओ क्लिप कुठेही प्रदर्शित झालेली नसावी, ही स्पर्धेची मुख्य अट आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम तीन शॉर्ट फिल्म साठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९२१७९४७९४ अथवा ९८२३२०७२९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. २४ मे रोजी पुरस्कार प्राप्त शॉर्ट फिल्म प्रदर्शित केल्या जाणार आहेत.दुहेरी उद्देशकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनजागरण करण्यासोबतच नवनवीन कलावंताच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा उद्देशही या स्पर्धेमागे असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या