शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाअभावी नागपुरातील वृक्षगणना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 11:57 IST

शहरातील मालमत्ता सर्वेक्षणात सायबरटेक कंपनीने घोळ घातल्याने टॅक्स वसुलीला फटका बसला आहे. याची जाणीव असतानाही आता शहरातील झाडांची गणना करण्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे.

ठळक मुद्देउद्यान विभागात २७३ पदे मंजूरकार्यरत फक्त ६५ एजन्सीच्या कामावर लक्ष कोण ठेवणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणात सायबरटेक कंपनीने घोळ घातल्याने टॅक्स वसुलीला फटका बसला आहे. याची जाणीव असतानाही आता शहरातील झाडांची गणना करण्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. परंतु उद्यान विभागातील मंजूर २७३ पदांपैकी जेमतेम ६५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातच शहरातील ९५ उद्यानांची देखरेख करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. झाडांची गणना करण्याचे काम खासगी संस्थेकडे दिले तरी या संस्थेच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी विभागाकडे कर्मचारी नाहीत. यामुळे झाडांची गणना अडचणीत आली आहे.डिसेंबरअखेरीस शहरातील झाडांची गणना केली जाणार आहे. यात वृक्ष निरीक्षक व सहायक वृक्ष निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु ही पदे रिक्त आहेत. सभागृहाच्या मंजुरीनंतर रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतरच ही पदे भरली जातील, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.दर आठवड्याला महापालिकेतून ४० ते ५० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु रिक्त जागांवर मागील काही वर्षांत भरती करण्यात आलेली नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदाचा भार सोपविण्यात आला आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका जवळजवळ सर्वच विभागाला बसत असून, उद्यान विभागाची स्थिती दयनीय आहे. शहरात महापालिकेच्या अखत्यारितील ९५ लहान, मोठी आणि मध्यम उद्याने आहेत. उद्यानाच्या विकासाची आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही उद्यान विभागाची आहे. मात्र, महापालिकेच्या उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी ६५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यातच कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामे करावी लागतात. महापालिकेच्या उद्यानांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. देखभाल-दुरुस्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अधिकाऱ्यांना जाब विचारतात. कामे केली नाहीत म्हणून त्यांना अनेकदा वेठीस धरण्यात येते. परंतु, विभागातील रिक्त पदे भरली कधी जाणार, असा प्रश्न महासभेत कुणीही उपस्थित करीत नाही.

५७ कर्मचारी अन्य विभागातविभागाची एकूण आस्थापना ही २७३ कर्मचाऱ्यांची आहे. आकृतिबंधात ही सर्व पदे मंजूर आहेत. परंतु १२१ कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात नियुक्ती करण्यात आली. अर्थात, १५२ पदे रिक्त आहेत. यापैकी ५७ कर्मचारी हे पालिकेच्या इतर विभागात कामाकरिता पाठविले. म्हणजेच केवळ ६५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर उद्यानांचा भार आहे.

वृक्ष निरीक्षक नाहीतशहरातील वृक्ष गणनेची कामे डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या कामासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून नियुक्त एजन्सीच्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता लागणारे वृक्ष निरीक्षक महापालिकेत नाही. अशातच, वृक्ष गणना चुकीची होण्याची शक्यता बळावली आहे. एजन्सीच्या कामावर लक्ष राहावे याकरिता नवीन आराखड्यात वृक्ष निरीक्षक आणि सहा.वृक्ष निरीक्षकांची पदे मंजुरीकरिता टाकण्यात आली असून सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर प्रस्ताव मंजुरीकरिता राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका