शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:22 IST

राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर व अमरावती परिक्षेत्राकरिता वेगवेगळे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारचा दणका : सिंचन घोटाळ्याच्या तपासाकरिता दोन एसआयटी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर व अमरावती परिक्षेत्राकरिता वेगवेगळे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवार, बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्यासह इतर आरोपींना जोरदार दणका बसल्याचे बोलले जात आहे. नागपूर व अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक (एसीबी) एसआयटीचे प्रमुख राहतील. त्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सहकार्य करतील व प्रत्येक अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या नेतृत्वाखाली तीन पोलीस उपअधीक्षक, आठ पोलीस निरीक्षक व आवश्यक पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक कार्य करेल. तपास वेगात व योग्यरीत्या पूर्ण व्हावा याकरिता पथकाला आवश्यक कायदेशीर व तांत्रिक सहकार्य पुरविले जाणार आहे.राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. सिंचन घोटाळ्याचा तपास निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याकरिता एसआयटी स्थापन करणार का,अशी विचारणा न्यायालयाने गेल्या १४ मार्च रोजी सरकारला करून यावर भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला होता. तसेच, सरकार यासंदर्भात सकारात्मक नसल्यास न्यायालय स्वत: योग्य ते निर्देश जारी करेल, अशी तंबी देण्यात आली होती. त्या आदेशामुळे सरकारने घोटाळ्याच्या तपासाकरिता दोन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने बुधवारी सरकारचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन अन्य मुद्दे विचारात घेण्यासाठी १८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित व अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, पवार यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता प्रसाद ढाकेफाळकर, बाजोरिया कंपनीतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी तर, सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल व अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.कुणाकडे किती प्रकल्पलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परिक्षेत्रीय कार्यालय २६, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय १७, ठाणे परिक्षेत्रीय कार्यालय १२ तर, अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय २ प्रकल्पांची खुली चौकशी करीत आहे.विभाग                                    एफआयआर                                       दोषारोपपत्रनागपूर एसीबी                             १४                                                          ०२अमरावती एसीबी                        ०१                                                           ००अमरावती ग्रामीण                       ०१                                                           ००

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पCorruptionभ्रष्टाचार