शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

फरक हेअर स्टाईलमध्येच!

By admin | Updated: July 27, 2014 01:27 IST

कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते.

शेजारी आणि नातेवाईकांची तरीही फसगत ठरलेलीच नागपूर : कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते. आता दोघीही मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांना एकमेकांसारखे दिसायला आवडत नाही. त्यामुळेच त्यांच्या दिसण्यातही थोडा फरक झाला आहे. पण साधारणत: जुळ्या बहिणींचे स्वभाव सारखे असतात तसे मात्र कनक - कस्तुरीचे नाही. कनकला जोक्स आवडतात आणि कस्तुरीला कसलाच जोक्स केलेले आवडत नाहीत. श्याम आणि अंजली निसाळ हे सुरेल दाम्पत्य कनक- कस्तुरीचे आई-वडील आहेत. घरातच संगीत असल्याने आणि घरीच संगीत विद्यालय असल्याने दोघींनाही संगीताची आवड आहे. दोघींची एक सवय मात्र सारखी आहे. दोघी एकमेकींशी खूप भांडतात पण झोपतात एकत्रच आणि उठायची वेळ सारखी. संगीताची आवड दोघींनाही असल्याने दोघीही गिटार आणि सतार तसेच तबलाही शिकत आहेत. यातली कनक जरा मॉड आहे. तिला आधुनिक पेहराव आवडतो तर कस्तुरीला भारतीय -पाश्च्यात्त्य यांचे फ्युजन असलेले वस्त्र आवडतात. कनक भिडस्त, बडबड करणारी, मोकळीढाकळी तर कस्तुरी लाजाळूचं झाड, नेमकेपणानेच बोलणारी. पण कस्तुरी न बोलताही आपले काम काढून घेते, असे कनकचे मत आहे. दोघींनाही स्पोर्ट्सची आवड आहे. अ‍ॅथ्लेटिक्स, लाँग जम्प, खो-खो आणि एनसीसीत दोघीही सोबत होत्या. नुकत्याच त्या उत्तराखंडला ट्रेकिंग कॅम्पसाठी गेल्या होत्या. दोघींच्या भांडणाने कॅम्प मधले सारेच हैराण झाले होते. त्यांचे भांडण होऊ नये दोघींना वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते.आई अंजली म्हणाल्या, लहानपणी कस्तुरीने बदमाशी केली आणि बाबांचा मार कनकला खावा लागला होता. त्यावेळी बाबांनाच फरक कळला नव्हता. लहानपणी दोघींना औषध देताना तारांबळ उडायची. तेव्हा कनकच्या पायाला ओळखीसाठी लाल रिबिन बांधून ठेवली होती. दोघींनीही यंदाच आर. एस. मुंडले शाळेतून दहावी उत्तीर्ण केले आहे. यात कनकला ८८ टक्के तर कस्तुरीला ८६ म्हणजे जवळपास सारखेच गुण मिळाले. दोघींच्याही मैत्रिणी वेगवेगळ्या आहेत. एकमेकींच्या ग्रुप्समध्ये त्या जातच नाही, त्यामुळे मैत्रिणींचा गोंधळ होण्याचा धोकाच नाही. सध्या दोघीही अकरावीत पं. बच्छराज व्यास विद्यालयात संगणक विज्ञान शिकत आहेत. पूर्वी होणारी फसगत मात्र आता होत नाही.