शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’मध्ये डिझेल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:44 IST

महापालिकेच्या आपली बस सेवेच्या ताफ्यातील हंसा ट्रॅव्हल्सच्या एमएच ३१ -सीए-६१८४ क्रमांकाच्या बर्डी ते गिडोबा नगर शहर बसने गुरु वारी दुपारी फेरी पूर्ण केली.

ठळक मुद्देसभापतींनी चालकाला रंगेहात पकडले : पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बस सेवेच्या ताफ्यातील हंसा ट्रॅव्हल्सच्या एमएच ३१ -सीए-६१८४ क्रमांकाच्या बर्डी ते गिडोबा नगर शहर बसने गुरु वारी दुपारी फेरी पूर्ण केली. त्यानंतर बस उभी असताना बसच्या डिझेल टँकमधून पाईपव्दारे डिझेलची चोरी करताना चालकाला रंगेहात पकडण्यात आले. परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे व परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी स्टींग करून चालकाला रंगेहात पकडले.गिडोबानगर येथे बस उभी केल्यानंतर बसच्या डिझेल टँकमधून डिझेल काढून विकले जात असल्याची माहिती कुकडे यांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसापासून येथे पाळत ठेवण्यात आली होती. मिळालेली माहिती खरी असल्याने गुुरुवारी बंटी कुकडे यांनी बसचा चालक सचिन गेचोटे याला टँकमधून डिझेल काढताना रंगेहात पकडले.या संदर्भात नंदनवन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिनने टँकमधून काढलेले दहा लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. चोरीचे डिझेल विकत घेण्याºयालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वीही चोरीचे डिझेल विकत घेतल्याची माहिती त्याने दिल्याचे कुकडे यांनी सांगितले. महापालिकेच्या बसमधून डिझेलची चोरी होत असल्याच्या यापूर्वीही घटना घडलेल्या आहेत. परंतु डिझेलची चोरी करताना रंगेहात पकडण्यात यश मिळत नव्हते. डिझेल चोरी करणारे रॅकेट असण्याची शक्यता आहे. यादृष्टीने माहिती घेणार असल्याचे कुक डे यांनी सांगितले.१२ महिला कंडक्टर निलंबितमहापालिके च्या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर वसुली करीत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत प्रवाशांनाीही व्हीडिओ पाठविलेले आहेत. अशा प्रकरणांची शहानिशा करून आजवर १२ महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. पुन्हा एक प्रकार उघडकीस आला आहे. यात दोषी आढळल्यास महिला कंडक्टरला निलंबित करणार असल्याची माहिती कुकडे यांनी दिली.