नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा काेविड-१९ संक्रमणाचा उद्रेक झाल्याने सरकार आणि प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पाॅझिटिव्ह हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने विषाणूने स्वत:चे स्वरूप तर बदलले नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही शक्यता लक्षात घेता नागपुरातील रुग्णांचे नमुने पुणेच्या इंडियन इंस्टिट्यूृट ऑफ व्हायरालॉजीकडे पाठविण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
पाच दिवसांपूर्वी रुग्णांचे सॅम्पल पुणेला पाठविण्यात आले हाेते. मात्र अद्याप प्रशासनाला त्यांची रिपाेर्ट प्राप्त झाले नाही. पालकमंत्री राऊत यांनी उशीर हाेत असल्याने नाराजी व्यक्त केली. प्रशासनही या रिपाेर्टची प्रतीक्षा करीत आहे. रिपाेर्टच्या आधारावर भविष्यातील नियाेजन करण्यात येणार आहे. पालकमंत्री म्हणाले, विषाणूचे म्युटेशन सामान्य गाेष्ट आहे. अनेकदा जेनेटिक बदलाने विषाणूच्या जीनाेममध्ये बदल हाेताे. पुण्यात पाठविलेल्या नमुन्यांच्या तपासणीतून सध्या सक्रिय असलेला विषाणूमध्ये बदल झाला आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. यावर आयसीएमआरकडूनच शिक्कामाेर्तब हाेइल. जिल्हा प्रशासन पुण्यातून येणाऱ्या रिपाेर्टबाबत आयसीएमआरकडे सूचना देतील. तज्ज्ञांच्या नुसार म्युटेशन किंवा जेनेटिक बदल ही नियमित प्रक्रिया आहे. विषाणूमध्ये बदल झाला असेल तरी भीतीचे कारण नाही. असे झालेही तरी काेराेनाची लस प्रभावी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवत येइल, असे काहींचे मत आहे.
लाॅकडाऊनमुळे अमरावतीत कंट्राेल
नितीन राऊत यांनी सांगितले, नागपूरमध्ये लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी अमरावतीमध्ये केलेल्या टाळेबंदीचा अभ्यास करण्यात आला. याठिकाणी काेराेना संसर्गावर नियंत्रण लावण्यात लाॅकडाऊनचा उपाय प्रभावी ठरला. या अनुभवाच्या आधारावरच नागपूरमध्ये १५ मार्चपासून लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर पक्षीय राजकारण हाेऊ नये कारण सर्वांना मिळून या आजाराशी संघर्ष करायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.