शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अतिसार नियंत्रण पंधरवडा अपुऱ्या औषधांवर

By admin | Updated: July 30, 2014 01:13 IST

राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात औषधींचा पुरवठा झालेला नाही. केवळ आठवडाभर पुरेल येवढाच औषधीसाठा आरोग्य विभागाजवळ आहे.

केवळ सोपस्कार : झिंक टॅबलेट, ओआरएसचा आठवड्याभराचा साठा सुरेंद्र राऊत - यवतमाळ राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात औषधींचा पुरवठा झालेला नाही. केवळ आठवडाभर पुरेल येवढाच औषधीसाठा आरोग्य विभागाजवळ आहे. या स्थितीत मडकोना येथे अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची सुरूवात करण्यात आली.निवडणुकीच्या तोंडावर आरोग्य विभागाची उपलब्धी दाखविण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे औषधीसाठा नसताना अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे जानेवारी महिन्यात ओआरएस आणि झिंक टॅबलेटची मागणी केली होती. मात्र अद्यापही औषधीचा पुरवठा झाला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्यांच्या स्तरावर खरेदी केलेली औषधी आहे. आणीबाणीच्या स्थितीसाठी हा साठा आरक्षित करण्यात येतो. मात्र विशेष कार्यक्रम आल्याने त्याचाच वापर केला जात आहे. जिल्ह्यात एक लाख ओआरएस पाकीट, झिंक टॅबलेटचे पाच लाख पाकीट उपलब्ध आहेत. अतिसार नियंत्रण पंधरवड्यासाठी ३२ लाख ओआरएस पाकीट आणि ३७ लाख झिंक टॅबलेट पाकीटची आवश्यकता आहे. हा औषधीसाठा शासनस्तरावरून पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शून्य ते पाच वयोगाटातील अतिसार झालेल्या बालकांना हे औषध देण्यात येणार आहे. याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आली आहे. हे औषध वितरण करण्यासाठी एक रुपया प्रती पाकीट याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. यावर आशा स्वयंसेविकांनी यापूर्वीच बहिष्कार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही औषधी लाभार्थ्यांची घरी पोहोचणार की, नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. सध्यातरी हा पंधरवाडा अंधातरीच असल्याचे दिसून येते. केवळ लादलेला कार्यक्रम राबवायाचा म्हणून यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.