शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

हिरेजडित दागिन्यांचा नजराणा : नागपुरात ‘इन्ट्रिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:30 IST

संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २० आॅक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ उपस्थित होते.

ठळक मुद्देदर्जेदार दागिने सणाचा आनंद करणार द्विगुणित‘डान्सिंग डायमंड’ विशेष दागिना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २० आॅक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ उपस्थित होते.प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या कल्पनेतून आविष्कृत झालेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ही नवी मालिका सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारी आहे. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन २० व २१ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शन सणांच्या दिवसांत नागपूरकरांसाठी एक सुवर्ण संधी आहे.उद्घाटनप्रसंगी दिलीप देवसिंघानिया, डॉ. विनोद बोरा, माधुरी बोरा, प्रेम लुणावत, एल.एन. शर्मा, चंचल शर्मा, नीना जैन, किरण जैन, रितू जैन, अ‍ॅड. रमेश दर्डा, अतुल कोटेचा, रघुवीर देवगडे, चंचल शर्मा, अनिता दर्डा, सेजल शाह, निकिता दर्डा, बीना जयस्वाल, सीमा सेठ, सुनीता सुराणा, सविता संचेती उपस्थित होते.पारंपरिक संस्कृती व अत्याधुनिकतेचा संगमऐन सणासुदीच्या दिवसांत लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नाविन्यपूर्ण व दर्जेदार हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार अनुभवायला मिळत आहे. अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे दागिने व त्यात साधण्यात आलेला पारंपरिक संस्कृती व अत्याधुनिकतेचा संगम हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशाप्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक दागिन्यातून कलात्मकतेचे दर्शन होणार आहे.

हिरेजडीत दागिन्यांचा अविष्कारयंदा ‘इन्ट्रिया’चे आयोजन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. हिरेजडीत दागिन्यांचा अविष्कार आहे. आप्तांना अत्युत्तम दर्जाचे दागिने भेट देण्याची ही अनोखी संधी लाभली आहे. हिऱ्याचे हे दागिने केवळ लग्न किंवा पारंपरिक समारंभासाठीच नाही तर सर्वप्रकारच्या समारंभात वापरण्याजोगे आहेत. विशेष म्हणजे महिलांसोबत पुरुषांसाठीदेखील अंगठी आदी दागिने आहेत. व्हाईट गोल्ड, येलो गोल्ड आणि पिंक गोल्डचा उपयोग करून तयार करण्यात आलेले दागिने हे ‘इन्ट्रिया’चे वैशिष्ट्य आहे. यावर्षी ‘डान्सिंग डायमंड’ हे अनोखे  कलेक्शन प्रदर्शित केले आहे. याशिवाय महिलांसाठी नेकलेस, पेंडंट, इअररिंग, रिंग्ज, ब्रेसलेट तर पुरुषांसाठी ‘कफलिंग्ज’, हिºयाचे दागिने आणि ‘बटन्स’चे पर्याय उपलब्ध आहेत. यात हिरे, माणिक, मोती, रुबी इत्यादींचादेखील उपयोग करण्यात आला आहे. 

ज्वेलरी डिझाईन हाऊसमध्ये ‘इन्ट्रिया’ आघाडीवर‘इन्ट्रिया’ची सुरुवात झाल्यापासून अत्यंत कमी कालावधीत याने लोकप्रियता मिळवली आहे. आज ‘इन्ट्रिया’चे नाव आघाडीच्या ज्वेलरी डिझाईन हाऊसमध्ये घेण्यात येते. ग्राहकांना तांत्रिकतेने परिपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तराचे दर्जेदार डिझाईन्स उपलब्ध करून देण्यासाठी ‘इन्ट्रिया’ नेहमीच तत्पर असते. ‘इन्ट्रिया’तील दागिन्यात साधारण, असाधारण व असाधारणला अविस्मरणीय करण्याची क्षमता आहे. येथील दागिने हे एकमेवाद्वितीय असून परिधान करण्यासदेखील सोपे आहेत. प्रत्येक दागिने तयार करताना आधुनिकतेसोबतच पारंपरिक आणि समकालीन भारतीय डिझाईन्सवरदेखील भर देण्यात आला आहे. हिरे, पन्ना, माणिक यांच्यामुळे दागिन्यांच्या श्रीमंतीत अधिक भर पडते. यात लग्नाच्या दागिन्यांसोबतच नेकलेस, ब्रेसलेट यांचा समावेश आहे. मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेल्या ‘इन्ट्रिया’चे संपूर्ण भारतभर प्रदर्शनांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येते. ‘इन्ट्रिया’चा प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि ट्रेंडी असावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येते. 

‘डान्सिंग डायमंड’ विशेष आकर्षणया दागिन्याचे वैशिष्ट म्हणजे १८ कॅरेट सोन्याच्या चेनमध्ये ५ सेंटचा हिरा जडविण्यात आला आहे. थोडीही हालचाल झाल्यास तो आपल्या जागेत फिरतो. हा दागिना नेहमीच चमकतो आणि महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारा आहे. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाPoorva Kothariपूर्वा कोठारी