शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजारापूर्वीच निदान शक्य

By admin | Updated: August 10, 2014 01:28 IST

‘इको कार्डिओग्राफी’मुळे हृदयविकाराचे निदान आजार बळावण्यापूर्वी करणे शक्य झाले आहे. परंतु ‘इको’ व ‘एमआरआय कार्डिओग्राफी’ यांचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे,

‘इको नागपूर-२०१४’ परिषदेचे उद्घाटननागपूर : ‘इको कार्डिओग्राफी’मुळे हृदयविकाराचे निदान आजार बळावण्यापूर्वी करणे शक्य झाले आहे. परंतु ‘इको’ व ‘एमआरआय कार्डिओग्राफी’ यांचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी येथे केले. नागपूर इको समिट व कार्डियालॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको नागपूर-२०१४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून युनायटेड स्टेट्स आॅफ अमेरिका येथून डॉ. नील विस्समन, डॉ. बिजोय खण्डेरिया, डॉ. पार्थो सेनगुप्ता, डॉ. जे. सी मोहन, डॉ. मनीश बन्सल, डॉ. नितीन बुरकुले, डॉ. श्रीकांत सोला, व डॉ. दिगंबर नाईक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शंतून सेनगुप्ता म्हणाले, हृदयरोग हा सर्वव्यापी जागतिक आजार आहे. यावर हृदयाचे स्पंदन टिपून चित्रीकरण करणारे ‘इको कार्डिओग्राफी’ मशीन उपचाराची दिशा ठरविण्यास अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हृदयरोगांचे प्राथमिक अवस्थेतच निदान व प्रतिबंधासाठी अत्याधुनिक छायांकन यंत्रांनी व तंत्रानी तपासणी करणे हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महेश फुलवानी यांनी केले. परिषदेत हृदयाच्या झडपा, हृदय निकामी प्रक्रिया तसेच कार्यक्षमता, क्षती, विशेष रचनात्मक दोष यांची चिकित्सा व चित्रांकन पध्दतीवर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ अजीज खान, डॉ. विकास बिसने, डॉ. उदय माहूरकर, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. निर्मल जायस्वाल, डॉ. दिगंबर नाईक डॉ. प्रशांत जगताप आदीनी वैज्ञानिक सत्रांचे अध्यक्ष व सह अध्यक्षपद भूषविले. या परिषदेत ३०० वर डॉक्टर सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. शंतून सेनगुप्ता, डॉ. महेश फुलवानी, डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. अनुज सारडा विशेष परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)