शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह ठरतोय शरीरसंबंधातील अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:13 IST

मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बऱ्याच कालावधीपासून हा आजार असल्यास कामेच्छा केंद्रावर त्याचा परिणाम होतो.

ठळक मुद्दे८५ टक्के पुरुषांमध्ये तर ६३ टक्के महिलांमध्ये लैंगिक समस्या

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बऱ्याच कालावधीपासून हा आजार असल्यास कामेच्छा केंद्रावर त्याचा परिणाम होतो. मधुमेहामुळे ‘प्रोलॅक्टिन’ रसायन वाढते. तसेच पुरुषत्वाचा ‘सेक्स हॉर्मोन’ ‘टेस्टोस्टेरॉन’ही कमी होत जातो. परिणामी, कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे मधुमेहींच्या कामसंबंधांमध्ये अंतर पडत जाते. दाम्पत्यांच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होतो. याला घेऊन ‘डायबेटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ने केलेल्या निरीक्षणात ‘टाईप २’ मधुमेह असलेल्या १००३ पुरुषांमधून तब्बल ८५ टक्के पुरुषांना, तर २६४ महिलांमधून ६३.३ टक्के महिलांना लैंगिक दोष असल्याचे आढळून आले.‘डायबेटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’चे संचालक व प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी ‘व्हँक्यूअर’ येथे आयोजित ‘वर्ल्ड डायबेटीज काँग्रेस’ मध्ये ‘टाईप २’ मधुमेही स्त्रियांमध्ये लैंगिक संबंधातील अडथळे यावर शोधनिबंध सादर केला. यात २६४ महिलांना शरीरसंबंधाची इच्छा, त्यातील उत्तेजितपणा, स्निग्धीकरण, परमोच्च आनंद, समाधान, वेदना यावर १५ प्रश्न विचारण्यात आले. यात १६६ महिलांना लैंगिक दोष असल्याचे आढळून आले. यात परमोच्च आनंद मिळत नसल्याची व संबंधाच्यावेळी वेदना होत असल्याची टक्केवारी जवळपास सारखीच असल्याचे समोर आले. याच स्वरूपातील निरीक्षण ‘सेंटर’च्यावतीने मधुमेह तज्ज्ञ डॉ. सचिन गाठे यांनी टाईप २’ मधुमेहाच्या पुरुषांवर केले. यावरील शोधनिबंध ‘इंटरनॅशनल डायबेटीज इंडिया कॉन्फरन्स’ कोलकात्ता येथे सादर करण्यात आले होते. यात १००३ पुरुषांमधून ८५ टक्के म्हणजे ८५३ पुरुषांमध्ये लैंगिक समस्या असल्याचे आढळून आले. मधुमेहातील हा सर्वात मोठा दूरगामी परिणाम आहे. याकडे ८० टक्के रुग्ण दुर्लक्ष करीत असल्याने ही गंभीर हृदयविकाराची धोक्याची घंटा ठरत आहे.

२.७ टक्के महिलांमध्ये शरीरसंबंधाची अनिच्छाया निरीक्षणात, मधुमेहपीडित रजोनिवृत्तीनंतरच्या २.७ टक्के महिलांमध्ये तर रजोनिवृत्तीपूर्वीच्या ३.४ टक्के महिलांमध्ये शरीरसंबंधाची इच्छा कमी झाल्याचे आढळून आले. रजोनिवृत्तीनंतरच्या २.९ टक्के महिलांमध्ये तर राजोनिवृत्तीपूर्वीच्या ३.७ टक्के महिलांमध्ये लैंगिक उत्तेजना कमी झाल्याचे दिसून आले. रजोनिवृत्तीनंतर ३.५ टक्के महिलांना तर रजोनिवृत्तीपूर्वीच्या ४.२ टक्के महिलांना योनीमार्गाच्या कोरडेपणाची समस्या असल्याचे आढळून आले. रजोनिवृत्तीनंतरच्या ३.७ टक्के महिलांना तर रजोनिवृत्तीपूर्वीच्या ४.४ टक्का महिलांना शरीरसंबंधातील परमोच्च आनंद मिळत नसल्याचेही सामोर आले. रजोनिवृत्तीनंतरच्या ४.१ टक्के महिलांना तर रजोनिवृत्तीपूर्वच्या ४.९ महिलांना समाधान मिळत नसल्याचेही पुढे आले. विशेष म्हणजे शरीरसंबंधात येणारे दुखणे दोन्ही गटात ४.१ व ४.५ टक्के एवढे आहे.

पुरुषांमध्ये तंबाखू, धूम्रपानही ठरतेय जबाबदारपुरुषांमध्ये ५१ ते ६५ या वयोगटात लैंगिक समस्येची टक्केवारी ८५ टक्के आहे. जसजसा मधुमेहाचा कालावधी वाढतो तसतशी ही टक्केवारी वाढत जात असल्याचे डॉ. गाठे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, या अभ्यासातून बहुसंख्य मधुमेहींमध्ये लैंगिक स्नायूंची अकार्यक्षमता आढळली. मधुमेहाच्या जोडीला वाढतं वय (चाळिशीपुढील), ताण-तणाव, तंबाखू-धूम्रपानाचे व्यसन आदी गोष्टींचाही लैंगिक स्नायूंच्या ‘फिटनेस’वर परिणाम होत असल्याचे या निरीक्षणातून समोर आले.

टॅग्स :diabetesमधुमेह