शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:24 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणावर धडक मोर्चा काढला. धरणाचे पाणी, प्रकल्पग्रस्तांना मोबदला व रोजगाराची मागणी करीत विलास भोंगाडे यांच्या ...

ठळक मुद्देधरणाचे पाणी, नोकरी, मोबदल्याची मागणी : धरणाचा मार्ग अडवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणावर धडक मोर्चा काढला. धरणाचे पाणी, प्रकल्पग्रस्तांना मोबदला व रोजगाराची मागणी करीत विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात मोर्चेकºयांनी प्रकल्पाकडे जाणारा मार्ग अडवला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत डाव्या कालव्यावर जनसभा घेण्यात आली.धरणाजवळच्या गावांना धरणाचे पाणी मिळावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची २० टक्के रक्कम त्वरित मिळावी, प्रकल्पग्रस्तांचे सुविधा देऊन पुनर्वसन करण्यात यावे, मासेमार प्रकल्पग्रस्तांना मासेमारीचा कायदेशीर अधिकार, ६८ गावठाण करण्यासाठी शेती देणाºया शेतकºयांना २०१३ चे पॅकेज, रोजगार आणि धरणातील बनशिंगाड्याच्या वेली काढण्यात यावे, आदी मागण्या करीत सोमवारी शेकडोच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला.गोसेखुर्द चौकापासून निघालेला मोर्चा डाव्या कालव्यावर थांबविण्यात आला. नियंत्रणासाठी अड्याळ पोलीस स्टेशनचे ठानेदार ताफ्यासह कालव्यावर पोहचले होते. आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी सभा घेण्यात आली.यावेळी विलास भोंगाडे, वामन भोयर, सीताराम रेहपाडे, प्रवीण मेश्राम, समिश्रा गणवीर, धर्मराज गणवीर आदींनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झाडे व अन्वेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी तासभर चर्चा केली. २०१८ पर्यंत गोसे बुजरुक, गोसेखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा, पाथरी आदी गावांच्या शेताला पाणी देण्यासह पुनर्वसनाची कामे व नागरी सुविधांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.त्यानंतर पोलीस निरीक्षकांना मागण्याचे निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्च्यामध्ये भीमराव भिमटे, रमेश भेंडारकर, जागो सूर्यवंशी, दादा आगरे, शिवशंकर माटे, गुलाब मेश्राम आदींचा सहभाग होता.