शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

दिवाळीत आॅनलाईन खरेदीची धूम

By admin | Updated: October 26, 2014 00:19 IST

आॅनलाईन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत आॅनलाईन खरेदीत ३५० टक्क्यांनी वाढ

३५० टक्क्यांनी वाढ : मोबाईलचा टक्का वाढलानागपूर : आॅनलाईन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत आॅनलाईन खरेदीत ३५० टक्क्यांनी वाढ झाल्याचा देशातील विविध व्यावसायिक संघटनांचा अंदाज आहे. दिवाळीत आॅनलाईन कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या विक्रीत इतिहास रचला. आॅनलाईन विक्री संकेतस्थळांकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळेच खरेदीला पसंती मिळाली. संकेतस्थळांकडून केल्या जाणाऱ्या खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे मॉल संचालन करणाऱ्यांचे मत आहे. एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, आॅनलाईन खरेदीच्या वाढणाऱ्या प्रमाणामुळे मॉलमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत ५० ते ५५ टक्क्यांची घट झाली आहे. देशात दिवाळीत १८ ते २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी आॅनलाईन संकेतस्थळांमार्फत झाली. आगामी तीन ते चार वर्षांत ही उलाढाल एक लाख कोटी रुपयांचा पल्ला गाठू शकेल, असा अंदाज आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी केल्यास लोकांना बिलाचे पैसे देण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. घरच्या घरी सुलभ खरेदी शक्यसणासुदीच्या हंगामात आॅनलाईन खरेदीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पट जास्त वाढ पाहायला मिळाली. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे, शृंगाराचे सामान, दागिने, भेटवस्तू, पादत्राणे अशा अनेक वस्तू आॅनलाईन विक्री संकेतस्थळांवरून खरेदी केल्या गेल्या. खरेदी केलेल्या वस्तू दोन ते तीन दिवसांतच ग्राहकांना घरपोच मिळत असल्याने ग्राहक आॅनलाईन खरेदीला पसंती देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मोबाईल विक्रीत १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भरभरून मिळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या किमती आणि खरेदीसाठी असलेल्या असंख्य पर्यायांंमुळे आॅनलाईन खरेदीचा कल वाढत आहे. त्यातूनही मोठ्या महानगरांमध्ये दुकानात जाऊन खरेदी करण्यामध्ये होणारी गैरसोय तसेच मुख्यत्वे सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश लोकांनी आॅनलाईन खरेदीलाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे. भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपड्यांच्या अ‍ॅक्सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, खेळणी, दागिने, सौंदर्य उत्पादने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. आॅनलाईन खरेदीचे फायदे असून घरपोच सेवेमुळे वेळेची बचत, २४ तासांत कधीही खरेदी शक्य, गर्दीत न जाता घरच्या घरी सुलभ खरेदी, उत्पादनांची तुलना करणे शक्य आहे. मोबाईलच्या उलाढालीत प्रचंड वाढयंदाच्या दिवाळीत चायनामेड हॅण्डसेटकडे पाठ फिरवित नागरिकांनी अद्ययावत मल्टिमीडिया सॉफ्टवेअर असलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात खरेदी केली. नागपुरात दसरा ते दिवाळीदरम्यान ५० कोटींच्या मोबाईलची विक्री झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी आणि वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो; परंतु यंदा या वस्तूंबरोबरच मोबाईल खरेदीकडेही लोकांचा अधिक कल राहिला. मल्टिमीडिया आणि टचस्क्रिनचा बोलबाला असल्याने सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, एलजी, झोलो, कार्बन, स्पाय या कंपन्यांच्या हॅण्डसेटलाही चांगली मागणी होती. अद्ययावत सॉफ्टवेअर असलेले हॅण्डसेट घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. मोबाईल बाजारात मल्टिमीडिया साफ्टवेअरची माहिती घेऊन अधिक प्रमाणात विक्री झाली. टचस्क्रिनच्या हॅण्डसेटमध्ये युवकांना थ्रिजी आणि मोबाईल गेमसह वायफाय आणि इतर सुविधा मिळत असल्याने युवकांचा या मोबाईलकडे कल होता. लॅपटॉपनंतर आता टॅब्सची मागणी वाढली आहे. टॅब्स नेण्यासाठी अधिक सोयीस्कर असल्यामुळे या टॅब्सकडे युवकांचाही कल वाढत असल्याची माहिती दिवाळी खरेदीतून समोर आली आहे.(प्रतिनिधी)