शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर धम्मशक्तीचे विराट दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:28 IST

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांती आणि सद्भावनासह एकतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देधम्मरॅलीच्या समारोपाला हजारोंची उपस्थिती : महिनाभरात रुजवला एकतेचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांती आणि सद्भावनासह एकतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली काढण्यात आली. महिनाभर शेकडो किलोमीटर पायी फिरून शहरातील तब्बल ४०० विहारांना भेट देत प्रत्येक वस्त्यांमध्ये धम्मसंदेश पोहोचवण्यात आला. रविवारी या धम्मरॅलीचा दीक्षाभूमीवर समारोप झाला. या समारोपालाही हजारो धम्मबांधवांनी सहभागी होऊन धम्मशक्तीचे विराट दर्शन घडविले.अनाथपिंडक परिवारतर्फे मागील तीन वर्षांपासून ही धम्मरॅली काढण्यात येते. भदंत ज्ञानबोधी आणि पी.एस. खोब्रागडे (श्रमण पय्याधम्मा) यांच्या नेतृत्वात २०० श्रमण भिक्खू या धम्मरॅलीत सहभागी झाले होते. दररोज किमान १५ ते २० किमी पायी चालून शहरातील ४०० विहारांना भेटी देण्यात आल्या. शहरात शांती व सद्भाव कायम राहावा, यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न या धम्मरॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. रविवारी सकाळी ११ वाजता भीम चौक जरीपटका येथून धम्मरॅलीला सुरुवात झाली.इंदोरा चौक, गड्डीगोदाम, एलआयसी, संविधान चौक मार्गे ही धम्मरॅली दीक्षाभूमीवर पोहोचली. श्रमण गौतम पाटील, अमन कांबळे, साहेबराव सिरसाट, सागर डबरासे, प्रीतम बुलकुंडे, राजू झोडापे, शिशुपाल कोल्हटकर आदी उपस्थित होते. प्रफ्फुल भालेराव, प्रफ्फुल मानके, महेंद्र कांबळे, असलम खान मुल्ला, महेश सहारे, पंकज लोणारे, विवेक निकोसे, संतोष खडसे, किशोर उके, संदीप मेंढे, किशोर कैथेल, विलास देशभ्रतार, योगेश लांजेवार, पृथ्वी शेंडे, राष्ट्रपाल पाटील, उषा मेश्राम आदींसह विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकाºयांसह हजारो धम्मबांधव सहभागी झाले होते.रस्त्यात ठिकठिकाणी स्वागतजरीपटका येथून निघालेल्या या समारोपीय धम्मरॅलीचे रस्त्यात ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. तरुण-तरुणींनी रस्ता झाडून आणि रस्त्यांवर पाकळ्या टाकून भिक्खू संघाचे स्वागत केले.