शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजीसीए’ला विमान भाडे निश्चितीचा अधिकार नाही

By admin | Updated: August 11, 2016 02:06 IST

नागरी उड्ड्यण महासंचालनालयाला (डीजीसीए) विमान प्रवास भाडे निश्चित करण्याचा अधिकार नाही,

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : २९ आॅगस्टला पुढील सुनावणी नागपूर : नागरी उड्ड्यण महासंचालनालयाला (डीजीसीए) विमान प्रवास भाडे निश्चित करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली आहे. महासंचालनालयाचे संचालक (एई) सुरेशकुमार सिंग यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. विमान कंपन्या मनमानी पद्धतीने प्रवास भाडे आकारून प्रवाशांची प्रचंड आर्थिक लूट करीत असल्याचा दावा एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. याप्रकरणात महासंचालनालयाने स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने महासंचालनालयाचे उत्तर लक्षात घेता सुनावणी २९ आॅगस्टपर्यंत तहकूब केली. अ‍ॅड. श्याम देवानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. विमान वाहतुकीच्या विकास व नियंत्रणासाठी धोरण निश्चित करण्याची आणि ‘एअरक्राफ्ट अ‍ॅक्ट-१९३४’मधील तरतुदींच्या अंमलबजावणीची जबाबदारी केंद्रीय नागरी उड्ड्यण मंत्रालयावर आहे. परंतु, मंत्रालय व नागरी उड्ड्यण महासंचालनालय स्वत:ची जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. देशात विमान कंपन्यांची फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाईन्स ही संघटना अस्तित्वात आहे. फेडरेशनच्या सदस्य विमान कंपन्या प्रवास भाडे निश्चित करताना कायद्याचे पालन करीत नाही. बहुतेक कंपन्या स्वत:च्या नियमानुसार वागतात. या कंपन्यांवर फेडरेशनचे काहीच नियंत्रण नाही. या कंपन्या प्रवास भाडे वाढविण्यासह कोणताही निर्णय संगनमताने घेतात. विशिष्ट काळात अचानक प्रवासभाडे वाढविले जाते. प्रत्येक दिवस व तासानुसार वेगवेगळे भाडे आकारले जाते. समान अंतराचा प्रवास असतानाही भाड्यामध्ये फरक असतो असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. नितीन लालवानी तर, महासंचालनालयातर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)