शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग जान्हवीची यशोभरारी; आयएएस होण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 10:50 IST

जिद्द असली की कोणताही अडथळा, कोणतीही कमतरता तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. जन्मापासून ८५ टक्के दिव्यांग असलेल्या जान्हवीने हे दाखवून दिले.

ठळक मुद्देविपरीत परिस्थितीशी झुंजत घेतले ८९ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिद्द असली की कोणताही अडथळा, कोणतीही कमतरता तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. जन्मापासून ८५ टक्के दिव्यांग असलेल्या जान्हवीने हे दाखवून दिले. व्हीलचेअरशिवाय चालताही न येणाऱ्या जान्हवीने सैन्याधिकारी असलेल्या वडिलांप्रमाणे कठीण प्रसंगाला तोंड देण्याची जिद्द बाळगत यश मिळविले.जान्हवी मनीष किन्हीकर या विद्यार्थिनीचे हे यश आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रूंमधून जाणवते. जान्हवीने इंग्रजी माध्यमातून कला विभागात ८९ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिचा जन्म म्हणजे घरात आनंद देणारा होता. पण स्पायना बायफिडा या आजारामुळे अपंगत्व येण्याची बाब घरच्यांना चटका लावणारी. पण आईवडिलांनी आपल्या लाडक्या लेकीला ही कमतरता जाणवू दिली नाही. खरं तर सुरुवातीला स्वत:ची ही अवस्था तिलाही निराश करणारीच होती, आईवडिलांच्या भक्कम आधारामुळे असलेली परिस्थिती स्वीकारण्यात आनंद मानला. मात्र ही कमतरता आपल्या गुणवत्तेने दूर करण्याची जिद्द तिने बाळगली. वायुसेनानगर येथे केंद्रीय विद्यालयात दहावीमध्ये ८.६ सीजीपीएने उत्तीर्ण होऊन स्वत:मध्ये असलेले कौशल्य सिद्ध केले. बारावीतही ८५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणारच, ही जिद्द तिच्यात होती आणि ८९ टक्के गुणांसह ती पूर्णही केली. विशेष म्हणजे हे सर्व तिने स्वत: अभ्यास करूनच प्राप्त केले. हिस्लॉप महाविद्यालयात प्रवेश केला, पण वर्गात बसली नाही. केवळ प्रात्यक्षिक परीक्षेपुरती तिची उपस्थिती असायची. यावेळी शिक्षकांचे मार्गदर्शन तिला मिळाले. हे मार्गदर्शन, स्वत:चे परिश्रम व आईवडिलांचा विश्वास या भरवशावरच तिने हे यश संपादन केले आहे. आता सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेचे ध्येय तिने मनाशी बांधले आहे आणि ते पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर दिसूनही येतो.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल