शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीपर्यंत विकास कामे ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST

मनपा आयुक्तांचे संकेत : वेतन आयोग व थकबाकी देण्यासाठी हवे ६४० कोटी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सातव्या वेतन ...

मनपा आयुक्तांचे संकेत : वेतन आयोग व थकबाकी देण्यासाठी हवे ६४० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सातव्या वेतन आयोगासाठी २४० कोटी व कंत्राटदारांची जुनी देण्यासाठी ४०० कोटीची गरज आहे. या रकमेची जुळवाजुळव करताना मनपा प्रशासनाला घाम फुटला आहे. त्यात कोविड संक्रमणामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम झाला. याचा विचार करता स्थायी समितीने सादर केलेला २०२०-२१ चा २,७३१ कोटीच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता दिसत नाही. याचे संकेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विकास कामाच्या फाईल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांना दिले आहे. सत्तापक्ष व आयुक्तात या विषयावर पडद्याआड वादळी चर्चा झाली. परंतु आर्थिक स्रोत विचारात घेता फेबु्रवारीपर्यंत विकास कामांना निधी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने कार्यादेश झालेली व नवीन विकास कामे ठप्पच राहणार आहेत.

मनपाच्या १४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच तोट्याचे बजेट सादर करण्यात आले. यासाठी कोरोनाला जबाबदार धरण्यात आले. ऑक्टोबर २० मध्ये बजेट सादर करण्यात आले. सादर केल्यानंतर जवळपास १५ ते २० दिवसांनी याला मंजुरी मिळाली. त्यानंतर पदवीधर मतदार संघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. डिसेंबरच्या सुरुवातीला निकाल आल्यानंतर आचारसंहिता संपली. परंतु सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातवा वेतन आयोग व कंत्राटदारांची जुनी देणी देण्यासाठी निधीची जुळवाजुळव करण्याच्या कामात प्रशासन लागले. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने आधीच अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार नसल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.

.......

स्थायी समिती कक्षातील गर्दी हटली

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात स्थायी समिती कक्षापुढे नगरसेवकांची वर्दळ राहायची. परंतु विकास कामांना ब्रेक असल्याने गर्दी हटली आहे. काही नगरसेवक फेरफटका मारून अंदाज घेतात. मात्र स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके उपस्थित असतात. समस्या जाणून घेतात.

......

बजेट रोखण्याचे अधिकार नाही - झलके

बजेटला सभागृहाने मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत ते थांबविण्याचा नैतिक अधिकार आयुक्तांना अजिबात नाही. मागील स्थायी समितीच्या तुलनेत ५०० कोटींनी तर तत्कालीन आयुक्तांच्या तुलनेत ५० कोटीने कमी रकमेचे बजेट दिले. कोविडमुळे तोट्याचे बजेट सादर करावे लागले. त्यातही अंमलबजाणी होत नसेल तर योग्य नाही. उत्पन्न न वाढण्याला मनपा प्रशासन जबाबदार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके म्हणाले.