शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा विकास हीच ‘भवन्स’ची विशेषता

By admin | Updated: November 11, 2015 02:36 IST

आधुनिक शिक्षणप्रणालीसोबतच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचेदेखील ज्ञान असले पाहिजे. भारतीय विद्या भवनमध्ये हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते

देवेंद्र फडणवीस : भारतीय विद्या भवनच्या कोराडी शाखेचे भूमिपूजननागपूर : आधुनिक शिक्षणप्रणालीसोबतच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचेदेखील ज्ञान असले पाहिजे. भारतीय विद्या भवनमध्ये हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे गुणवत्ता हाच प्रवेशाचा निकष असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय विद्या भवन शाळेच्या नागपुरातील पाचव्या शाखेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.कोराडीतील नांदा येथे शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या १० एकर जमिनीवर ही शाळा उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.कृपाल तुमाने, आ.सुनील केदार, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, ‘एमएसईबी’चे संचालक विश्वास पाठक, माजी आमदार आशीष जयस्वाल, कोराडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना मैंद हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय विद्या भवनच्या नागपूर केंद्राचे अध्यक्ष व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी भूषविले.आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा असे पालकांचे स्वप्न असते. कोराडी परिसरातील मुलांना दर्जेदार शाळेत शिकण्याची संधी मिळणार आहे. यातील ६० टक्केहून अधिक जागा या स्थानिक रहिवासी तसेच ‘महाजेन्को’तील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी असतील असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मुलांना या शाळेच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. कोराडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार असल्यामुळे शाळेला वेगळे महत्त्व प्राप्त होईल असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. बनवारीलाल पुरोहित यांनी प्रास्ताविकादरम्यान शाळेची माहिती दिली.यावेळी भारतीय विद्या भवनच्या नागपूर केंद्राच्या कार्यकारी समितीतील सदस्य अ‍ॅड.के.एच देशपांडे, सचिव डॉ.सुनंदा सोनारीकर, कोषाध्यक्ष के.एम.अग्रवाल, डॉ.विनय नांगिया, राजेंद्र पुरोहित, पद्मिनी जोग, राकेश पुरोहित, डॉ.पन्ना आखानी, प्रा.क्यू.एच.जीवाजी, डॉ.ए.के.मुखर्जी, संचालक टीजीएल अय्यर, सहसंचालक राजा अय्यर, कुलसचिव विजय ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. शिवाय भवन्सच्या विविध शाखांमधील प्राचार्या अन्नपूर्णी शास्त्री, अंजू भुतानी , पार्वती अय्यर आणि जानकी मानी यांचीदेखील उपस्थिती होती. उमा दुराईराजन यांनी संचालन केले तर राजी श्रीनिवासन यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)