शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांच्या विकासाची योजनाच भरकटली

By admin | Updated: October 17, 2016 02:43 IST

ताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे टार्गेट शून्य : राज्यात सात वर्षात केवळ चार वसाहती बांधल्यामंगेश व्यवहारे  नागपूरताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते. परंतु भटके विमुक्त हा समाज अतिवंचित घटकातील असून अतिशय दुरावस्थेत जगत आहे. त्यांनी कधीही सरकारची अडवणूक केली नाही. रस्त्यावर उतरून कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. असे असतानाही सरकार त्यांच्यासाठीच्या योजना राबविण्यात अपयशी ठरते आहे. भटक्यांना स्थायी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली. दरवर्षी बजेटमध्ये योजनेसाठी निधीचीही तरतूद करण्यात आली. परंतु योजनेचे टार्गेट सरकारला पूर्ण करता आले नाही. राज्यात भटक्यांच्या विकासाच्या योजनेचीच आज भटकंती झाल्याचे चित्र आहे. सरकारने राबविलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत भटक्या समाजाला ५ गुंठे जमीन उपलब्ध करून देऊन, त्यावर २६९ चौ. फुटाची घरे बांधून द्यायची होती. उर्वरित जागेवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भटक्यांची लोकसंख्या असलेली ३ गावे निवडून त्या गावातील २० कुटुंबांसाठी वसाहत तयार करून योजनेचा लाभ देण्यात येणार होता. २०११ ला योजना सुरू झाली असली तरी, २०१२-१३ पासून बजेटमध्ये योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली. दरवर्षी किमान ५ ते १० कोटींची सरकार तरतूद करीत होते. असे असतानाही ७ वर्षात केवळ राज्यात ४ वसाहती बांधण्यात आल्या. नियमानुसार आतापर्यंत कि मान ५०० वसाहती बांधणे अपेक्षित होते. लातूरमध्ये २०१२-१३ मध्ये २ वसाहती बांधण्यात आल्या. एक वसाहत यवतमाळातील आर्णी येथे बांधली व एक वसाहत सोलापूर येथील परग्गे येथे मंजूर झाली. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यात वसाहती झाल्या नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने या योजनेसाठी साधे सर्वेक्षण सुद्धा केले नाही. माहितीच्या अधिकारात या योजनेसंदर्भात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या माहितीनुसार योजनेकडे झालेले दुर्लक्ष लक्षात येते. सर्वे संदर्भात मागितलेल्या माहितीत बहुतांश जिल्ह्यांनी निरंक असेच पाठविले. एका जिल्ह्याने तर ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर दिले. नागपूर, वर्धा, भंडारा, सिंधुदूर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांनी सर्वे केला.मात्र, त्याचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविले नाही. ही योजना सामाजिक न्याय विभागाबरोबरच वन, महसूल, गृहनिर्माण, ग्रामविकास, नियोजन आणि वित्त विभाग या सर्वांना मिळून राबवायची होती. परंतु योजनेची महत्त्वाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाची होती. परंतु कुठल्याच विभागाने भटक्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे भटक्यांची भटकंती काही थांबली नाही.