शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार कोटींचा विकास आराखडा

By admin | Updated: May 12, 2015 02:21 IST

नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार

महापालिका : सुधारित आराखडा मंजुरीसाठी सभेत मांडणारनागपूर : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०४१ सालापर्यंतचा ३४,६०४ कोटीचा सुधारित शहर विकास आराखडा तयार केला आहे. १८ मे रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.सध्याची परिस्थिती व भविष्यातील गरजांचा विचार करून शहराचा विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने मे.क्रिसील रिस्क अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड एजन्सीने हा आराखडा तयार केला आहे. शहरी विकास तसेच शहरी रोजगार व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरु त्थान अभियान अंतर्गत शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी २००६ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या दृष्टीने विकासाचा प्रयत्न करण्यात आला. केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने नागरी विकास क्षमता बांधणी हाती घेतली आहे. यासाठी भारतातील काही शहरांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात नागपूर शहराचा समावेश आहे. त्यानुसार २००६ मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सुधारणा करून २०४१ पर्यंतचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.हा आराखडा तयार करताना विविध सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय व गैरशासकीय संस्थांचे अधिकारी, यांच्यासमक्ष आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होेते.(प्रतिनिधी)अशी होईल विकास कामे विभाग खर्च (कोटीत)पाणीपुरवठा ६७१सिवरेज व शौचालय १३६६रस्ते व वाहतूक २२०५३पावसाळी नाल्या ३६९२कचऱ्यावर प्रक्रिया ३६८झोपडपट्टी विकास ४८११पुरातत्त्व विकास ५३४पर्यटन विकास २०१ई-गव्हर्नन्स १६०सामाजिक उपक्रम १९४पर्यावरण ४५७आपत्ती निवारण ९५ दोन टप्प्यात राबविणार आराखडासुधारित शहर विकास आराखडा २०४१ सालापर्यंतचा असला तरी नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तो दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २०२१ सालापर्यंत २७,३५० कोटी तर दीर्घ मुदतीत २०४१ पर्यत ३४६०४ कोटीचा भांडवली गुंतवणुकीचा आराखडा तयार केला आहे.