शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी विकासाची योजना तयार करा

By admin | Updated: April 27, 2016 03:06 IST

नागपूर शहरातील विविध भागातील महापालिका, नासुप्र, नझूल व रेल्वे विभागाच्या मालकीच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या अनुसूचित जाती,

देवेंद्र फडणवीस : ५०० चौरस फुटाचे पट्टे मोफतनागपूर : नागपूर शहरातील विविध भागातील महापालिका, नासुप्र, नझूल व रेल्वे विभागाच्या मालकीच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवगींय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना ५०० चौरस फुटापर्यंत जागा मोफत देण्यात येईल. तसेच त्यानंतरच्या जागेसाठी त्या-त्या भागातील रेडिरेकनरनुसार दर लावून भूखंड देण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी येथे आयोजित बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, नागो गाणार, गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी व नासुप्रचे सभापती सचिन कुर्वे, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, भूषण शिंगणे, रमेश सिंगारे, संदीप जोशी, परिणय फुके, बाल्या बोरकर व लिना बुधे आदी उपस्थित होते.३१ डिसेंबर २००० पूर्वी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ देण्यात यावा. प्रत्येक ले-आऊ टची योजना महापालिकेने तयार करावी. ही योजना तयार करताना एखादे घर मध्येच येत असेल तर त्या घरमालकाला दुसरीकडे पर्यायी जागा देण्यात यावी. शहरातील झोपडपट्ट्या झुडपी जंगलाच्या जागेवर वसलेल्या आहेत. अशा जागांचा विभागनिहाय एकत्रित प्रस्ताव तायर करून वनविभागाला पाठविण्यात यावा. त्या जमिनी झुडपी जंगलातून मुक्त करण्यात याव्या. अशी सूचना फडणवीस यांनी केली. झुडपी जंगलाचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार करावा. जी शासकीय कार्यालये झुडपी जंगल म्हणून नोंद असलेल्या जागांवर आहे. अशाही जागांचे प्रस्ताव तातडीने वनविभागाकडे पाठवून त्या प्रस्तावाला मंजुरी घ्यावी. असे ते म्हणाले. अनधिकृत ले-आऊ टमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी करण्यात आलेल्या १०० कोटी रुपये खर्चाच्या तरतुदीतून विविध कामे करण्यात यावी. नासुप्रच्या मालकीच्या जागेवर ५२ झोपड्या वसलेल्या आहेत. यातील ३५ झोपडपट्ट्या महापालिकेने गलिच्छ वस्ती म्हणून अधिसूचित केलेल्या आहेत. नासुप्र, महापालिका, नझूल, खासगी व रेल्वे यांच्या मालकीच्या जागांवर ८६ झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. पैकी ६१ झोपडपट्ट्यांना गलिच्छ वस्त्या म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे. मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यासाठी झोपडपट्टीधारक ांची गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करून तसे प्रस्ताव नासुप्रकडे सादर करण्याबाबत १० जुलै २००२ च्या शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले होते. परंतु याबाबतचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याने झोपडपट्टी विकास कामात शिथिलता आली होती. यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अधिसूचनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. झोपडपट्टी विकासाची योजना आखताना दोन, तीन एकर जागा सफाई कामगारांच्या घरकूल योजनेसाठी राखून ठेवण्यात यावी. असे निर्देश फडणवीस यांनी नासुप्रला दिले. नागनदीच्या काठावर वसलेल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात यावा. तसेच यापुढे सरकारी जागांवर अतिक्रमण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करावी,असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)झोपडपट्टी मुक्त नागपूरनागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील झोपडपट्टीत चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. या संदर्भात सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी रागमिरी येथे स्मार्ट सिटी सादरीकरणाच्या वेळी दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील झोपडपट्टी सुधार व सुविधा कशा राहतील. तसेच नागपूर झोपडपट्टीमुक्त कसे राहतील याबाबत एम.एम.प्रोजेक्ट कन्सलटंटचे अध्यक्ष मुकेश मेहता यांनी सादरीकरणातून माहिती दिली.