शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांचा हैदोस

By admin | Updated: October 11, 2015 03:22 IST

उपराजधानीतील विविध भागात शनिवारी सकाळी तोतया पोलिसांनी हैदोस घातला.

वृद्धांचे दागिने लुटले : नंदनवन, अजनीत गुन्हेनागपूर : उपराजधानीतील विविध भागात शनिवारी सकाळी तोतया पोलिसांनी हैदोस घातला. अवघ्या पाऊण तासात दोन वृद्धांचे १ लाख रु. किंमतीचे दागिने आरोपींनी लंपास केले. नंदनवन आणि अजनी परिसरात या घटना घडल्या. हसनबागमधील एलआयजी कॉलनीत राहणारे वल्लभदास भिकचंद राठी (वय ८०) हे शनिवारी सकाळी ९.३० वाजता नंदनवन कॅनल रोडने पायी जात होते. अमोल बिल्डीग समोर ३५ ते ४० वयोगटातील दोन आरोपी मोटारसायकलने त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून समोर लुटमारीच्या घटना घडल्याची भीती दाखवत त्यांनी राठी यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या रुमालमध्ये ठेवण्यास सांगितल्या. त्यानंतर राठी यांचे लक्ष विचलित करून आरोपींनी त्यांना रुमाल देऊन अंगठ्या लंपास केल्या. काही वेळेनंतर राठी यांनी रुमाल पाहिला तेव्हा त्यात अंगठ्या नव्हत्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवनचे पीएसआय आर.पी. राऊत यांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी राठी यांच्या अंगठ्यांची किंमत २९ हजार रुपये नोंदवली आहे. या घटनेच्या पाऊण तासापूर्वी सुयोगनगर चौकातही अशीच घटना घडली. सेवकचंद्र दगडुजी डोहे (वय ६७, राजगृह निवास, सुयोग नगर) हे आपल्या घरी जात असतांना ३० ते ४० वयोगटातील दोन आरोपींनी त्यांना रोखले. आम्ही सीआयडीचे पोलीस आहोत, अशी बतावणी करून यापूर्वी परिसरात झालेल्या चोरीचा तपास करीत आहोत. तुम्ही स्वत:ची सुरक्षा कधी करणार, असा सवाल करीत डोहे यांना त्यांची सोनसाखळी, २ अंगठ्या असा ६८ हजारांचा ऐवज काढून ठेवा म्हटले.हे दागिने घेऊन आरोपी पळून गेले. अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या दोन्ही घटनांमधील साम्य बघता आरोपी एकच असावे, असा पोलिसांचा कयास आहे. (प्रतिनिधी)