शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आत्महत्येनंतरही संकटाचं ओझं!

By admin | Updated: June 28, 2015 03:04 IST

वाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला.

बँकेची कर्जवसुलीसाठी नोटीस : धुणीभांडी करतेय शेतकऱ्याची पत्नीवसीम कुरेशी  नागपूरवाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला. परंतु त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाचे कष्ट कमी झाले नाही. त्याचे कुटुंब आता अनेक संकटांचा सामना करीत आहे. शासनाच्या दफ्तरी शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्याचा लाभ त्याच्या कुटुंबास काहीच झाला नाही. काही वर्षांपूर्वी कामठी तालुक्यातील टेमसना येथे आपली साडेसात एकर जमिनीत शेती करून विजय नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याला कर्ज घ्यायची गरजही पडली नाही. तीन वर्षांपूर्वी हवामानाने साथ न दिल्यामुळे त्याच्या शेतात नापिकी झाली. त्यानंतर त्याने २०१३ मध्ये आशेपोटी बँकेकडून १ लाख १३ हजार ८०० रुपयांचे कर्ज घेतले. त्याच्या शेतात पीक तर आले परंतु अतिवृष्टीमुळे ते वाया गेले. कर्जाच्या चिंतेमुळे विजयने १७ एप्रिल २०१४ रोजी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे नवव्या वर्गात असलेल्या त्याच्या अमोल नावाच्या मुलास काम करणे भाग पडले. त्याची आई माला विजय नरड ही सुद्धा दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करू लागली.परंतु विजयची आत्महत्या शासनाच्या दफ्तरी केवळ आत्महत्या म्हणूनच राहिली.मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावेकमी वयात पतीचा मृत्यू झाला. मुलांचा सांभाळ करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शासकीय कार्यालयाच्या चकराही माराव्या लागत आहेत. इतके दु:ख सोसले, यापुढेही दु:ख झेलण्याची तयारी आहे. अशा स्थितीत शासनाकडून मदत मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे मदत मिळाल्यास कर्ज फेडण्यास मदत होऊन मुलांचे शिक्षण तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा माला विजय नरड यांनी व्यक्त केली.अनेक शेतकरी आत्महत्यांची नोंदच नाहीशेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक प्रकरणांची शासनाकडे नोंदच नाही. शेतकऱ्यांच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे. आता गाव शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्याने लावलेले पैसेही वसूल होत नाहीत. त्यात हवामानाची साथ मिळत नाही आणि सध्याचा जमीन अधिग्रहण कायदा इंग्रजांच्या शासनापेक्षाही घातक आहे.-संजय सत्यकार, शेतकरी नेता