नागपूर जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पाहिजे त्या प्रमाणात औषधे व आराेग्य सुविधा मिळत नसल्याने गरीब रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. ऑक्सिजन उपलब्ध हाेत नसल्याने रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने शहरात इंजेक्शनचा काळाबाजार चालला असून, एक- एक हजाराचे इंजेक्शन २५, ३० हजारांना घ्यावे लागत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून गरीब रुग्णांची मदत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते राजू लाेखंडे व शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी केली. किशोर कैथल, प्रवीण पाटील, संजय सूर्यवंशी, भरत लांडगे, लहानू बन्सोड, सिद्धार्थ जवादे, विशाल शेंडे, अनिल शेंडे, दीपक लोखंडे, सुमित चव्हाण, मयूर मंडाके, रमेश कांबळे, राकेश रामटेके, अशोक वाघमारे, पप्पू वासनिक, नीलिमा डंबारे, कांचन देवगडे, महेंद्र गजभिये, अजय कोचे, विजय गोंडुले, प्रफुल्ल गणवीर, दीक्षित मेश्राम, सुमित चव्हाण, प्रांजल पाटील, प्रशांत पाटील, राजू रामटेके आदी याप्रसंगी उपस्थित होते.
गडकरींच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST