शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ठेवी परत करतो’

By admin | Updated: August 26, 2014 01:02 IST

गुंतवणूकदारांच्या ठेवी जामीन मंजूर झाल्यानंतर एका वर्षात परत करण्याचे हमीपत्र श्रीसूर्या समूहाचा प्रबंध संचालक आरोपी समीर सुधीर जोशी याने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे

न्यायालय : समीर जोशीचे हमीपत्रनागपूर : गुंतवणूकदारांच्या ठेवी जामीन मंजूर झाल्यानंतर एका वर्षात परत करण्याचे हमीपत्र श्रीसूर्या समूहाचा प्रबंध संचालक आरोपी समीर सुधीर जोशी याने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. जोशीने हे हमीपत्र आपले वकील अ‍ॅड. अशोक भांगडे यांच्यामार्फत दाखल केले आहे. सध्या समीर जोशी हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असून, त्याने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झालेली आहे. त्यावर आदेश होणे बाकी आहे. अमित मोरे यांच्या तक्रारीवरून १५ सप्टेंबर २०१३ रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन, १५ आॅक्टोबर रोजी समीर जोशी तर २९ आॅक्टोबर रोजी त्याची पत्नी आणि श्रीसूर्या समूहाची संचालिका पल्लवी जोशी हिला आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली होती. ठेवीवर त्रेमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून या दाम्पत्याने ५ हजार ९२ गुंतवणूकदारांची २४७ कोटी १४ लाख रुपयांनी फसवणूक केलेली आहे. तक्रारी केवळ ८०० ते ९०० लोकांच्या असून, फसवणुकीचा हा आकडा १०० कोटी आहे. १३ डिसेंबर २०१३ रोजी या दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले आहे. दाखल हमीपत्रानुसार समीर हा केवळ तक्रारकर्त्यांच्याच ठेवी परत करणार आहे. दरम्यान, पीडित गुंतवणूकदारांचे वकील अ‍ॅड. बी. एम. करडे हे समीर जोशी याच्या पेशीच्या पुढच्या तारखेच्या दिवशी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात अर्ज दाखल करून आरोपीचे ठेवी परतफेडीचे स्रोत काय, याबाबत विचारणा करणार आहे.न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. अशोक भांगडे तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)