नागपूर : स्वाधार योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेची उर्वरित रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी मानव अधिकार संरक्षण मंचतर्फे करण्यात आली असून यासंदर्भात मंचच्या शिष्टमंडळाने समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड याांना निवेदन सादर केले.
शिष्टमंडळात मंचचे आशिष फुलझेले, सचिन रामटेके, राजीव खोब्रागडे, अलोक गजभिये, सुमित कांबळे, नीलेश भिवगडे, अनुराग ढोलेकर, मोनिश बावनगडे, सुमित मेश्राम, नीरज रंगारी, कपिल दामोदर, अमित सिंग, राकेश सोनुले, संदीप वाघमारे, सिद्धार्थ बन्सोड, अमित रंगारी, विशाल धाकडे, रिषभ दहीकर, मोनिश मांडवे आदी उपस्थित होते.