शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग ६८ खटले दाखल करणार

By admin | Updated: October 17, 2016 02:42 IST

यंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची प्रचंड विक्री झाली आहे. त्यामुळे रोज नवनवीन कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत.

अप्रमाणित बियाणे : सोयाबीन, कापूस व धान बियाण्यांचा समावेशजीवन रामावत नागपूरयंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची प्रचंड विक्री झाली आहे. त्यामुळे रोज नवनवीन कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यात हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सिड्स या सारख्या काही कंपन्याविरूद्ध गुन्हे सुद्धा दाखल झाले. शिवाय कृषी विभागाने पुन्हा काही कंपन्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी चालविली आहे. सोबतच आता अप्रमाणित बियाणे प्रकरणी तब्बल ६८ खटले दाखल केले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार, कृषी विभागाने सोयाबीन, कापूस व धान या तीन पिकांच्या बियाण्यांचे एकूण १ हजार २०६ नमुने काढले होते. त्यात १४३ नमुने बियाणे उत्पादक कंपनीतून घेण्यात आले होते, तर उर्वरित १ हजार ६३ नमुने बियाणे विक्रेत्यांकडून काढण्यात आले. यानंतर त्यापैकी ७३२ नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यापैकी १०७ नमुन्यांचा अहवाल हा अप्रमाणित (फेल) आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बियाणे उत्पादक क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे. महाबीजचे ११ नमुने फेल नागपूर : कृषी विभागाच्या माहितीनुसार सोयाबीन बियाण्यांमध्ये अकोला येथील महाबीज, नागपुरातील अंकूर सिड्स प्रा. लि., बसंत अ‍ॅग्रोटेक प्रा. लि., इंदौर येथील ईगल सिड्स अ‍ॅण्ड बायो, फार्म इनपुट ट्रेडिंग, नागपुरातील महागुजरात सिड्स प्रा. लि, हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सिड्स प्रा. लि. व पाचोरा येथील निर्मल सिड्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचे एकूण १६ नमुने फेल आले आहेत. तसेच कापूस बियाण्यांमध्ये औरंगाबाद येथील अजित सिड्स, दिल्ली येथील बायर बायो सायन्स प्रा. लि, सिकंदराबाद येथील कावेरी सिड्स, जालना येथील कृषीधन सिड्स, औरंगाबाद येथील किर्तीमान अ‍ॅग्रो जेनेटिक्स, हैदराबाद येथील निझिविडू सिड्स, अहमदाबाद येथील नवकर हायब्रिड, श्री सत्या अ‍ॅग्री बायोटेक प्रा. लि,राजकोट येथील सोलर अ‍ॅग्रोटेक प्रा. लि. व हैदराबाद येथील लाया सिड्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचे १४ आणि धान बियाण्यांमध्ये अकोला येथील महाबीज, बसंत अ‍ॅग्रोटेक, सेलू येथील दफ्तरी अ‍ॅग्रो सिड्स प्रा. लि., गोंदिया येथील केशव खनक सिड्स, नागपुरातील महागुजरात सिड्स प्रा. लि., माणिक्य सिड्स, हिंगणघाट येथील रायझिंग सन सिड्स, श्री गोकुल, विश्वरूप सिड्स व हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सिड्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचे ७७ नमुने अप्रमाणित ठरले आहेत. यामध्ये यशोदा हायब्रिड सिड्स प्रा. लिमिटेडचे सर्वांधिक म्हणजे, ४० नमुने फेल आले असून, त्यापाठोपाठ रायझिंग सन कंपनीचे १९, महाबीजचे ११ आणि महागुजरात सिड्स प्रा. लिमिटेडच्या ६ नमुन्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)