शहरात ८ तर ग्रामीणमध्ये १४ रुग्णांची नोंद : मनपाकडे प्रभावशाली यंत्रणेचा अभावनागपूर : उपराजधानीत गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. गेल्या वर्षी या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच गारद झाली होती. सध्या डेंग्यूचा प्रकोप कमी असला तरी नागपूरकरांमध्ये डेंग्यूविषयी भीती अद्यापही कायम आहे. २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७, २०१३ मध्ये २४०, २०१४ मध्ये ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील महिन्यात नागपूर जिल्ह्यात २२ रुग्ण आढळून आले असून यात शहरातील आठ रुग्णांचा समावेश आहे.दरवर्षी पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्व काळजी घेतली जात नाही. गेल्या वर्षी रोगाने थैमान घातले होते, परंतु आजार पसरू नये यासाठी महानगरपालिका केवळ जनजागृतीवर भर देत असल्याची आजही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणाच नाही. मनपाने अद्यापही निमआॅईल सारखे डास रोधक औषध झोन कार्यालयांना उपलब्ध करून दिलेले नाही. मनपाकडे स्वत:ची यंत्रणाही नाहीनागपूर : मनपाकडे या रोगाचे निदान करण्यासाठी स्वत:ची यंत्रणाही नाही. रुग्णांचे संशयित नमुने मेयो रुग्णालयात पाठविले जात आहे. याचा अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने रुग्ण अडचणीत येतो. या वर्षी मनपा डेंग्यूचे निदान करणारी ‘एलायझा टेस्ट’ करणारी मशीन खरेदी करणार होते, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. यावरून अत्यंत संवेदनशील व डेंग्यूसारख्या नाजूक बाबतीत मनपा प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून येते. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला पूर्णत: अधिकार दिल्यास चित्र वेगळे दिसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)१३०० घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्यामनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने मे २०१५ पासून घरा-घरांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख घरांची तपासणी करण्यात झाली आहे. यात १३०० घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. हनुमानगनगर व लकडगंज झोनमधील घरांमध्ये सर्वात जास्त डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्याची माहिती आहे. खबरदारी आवश्यकडेंग्यूवर लस किंवा औषधे उपलब्ध नाही. यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, इमारतीवरील टाक्यातील पाणी, घरासभोवतालच्या टाकावू वस्तू उदा. प्लॅस्टिकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरु पयोगी टायर्स इत्यादीमध्ये कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवल्यास डास अंडी घालून उत्पत्ती होते. तेव्हा अशा निरु पयोगी वस्तूमध्ये पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यविस्थत झाकून ठेवावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत. तसेच अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. घरांवरील टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवावी. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपराजधानीला डेंग्यूचा डंख
By admin | Updated: August 8, 2015 02:57 IST