शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीला डेंग्यूचा डंख

By admin | Updated: July 19, 2015 03:13 IST

मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे.

मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर भरंनागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने या रोगाचा शहरात फैलाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात डेंग्यूचे संशयित रु ग्ण आढळून येत असतानाच जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाने केला आहे. वास्तविक डेंग्यूची चाहूल लागल्याने मनपा प्रशासनाने मे महिन्यात जनजागृती अभियान हाती घेतले होते. या आजाराची लक्षणे व त्यापासून संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची खरदारी या विषयी लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने डेंग्यूच्या उत्पत्तीला संजीवनी मिळाली आहे. गेल्या दोन आठवड्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संंख्येत वाढ झाल्याची माहिती सदर येथील एका पॅथॉलॉजी संचालकाने दिली. शहराच्या उत्तर व दक्षिण भागातील अविकसित ले-आऊ टमध्ये टिकठिकाणी खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत एमएल आॅईलची फवारणी केली जाते. परंतु यामुळे डासांना आळा बसत नाही. वातावरण दमट असल्याने फॉगिंगचाही उपयोग होत नाही. आॅगस्ट महिन्यात डेंग्यूला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र जुलै महिन्यातच या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू होण्याची कारणेउपराजधानीला डेंग्यूचा डंख नागपूर : एडीज इजिप्ती मादी डास असतो. तो दिवसाला चावतो. हा डास चावल्याने डेंग्यूचे विषाणू माणसाच्या शरीरात शिरतात. या डासाची उत्पत्ती पाण्याची टाकी, जुने टायर, जमा झालेले पाणी आदी ठिकाणी होते. या आजावर उपचार होतो. परंतु वेळीच दखल घेण्याची गरज आहे.डेग्यूची लक्षणे ताप येणे, सांधे दुखणेशरीर अकडणेसर्दी-खोकला व डोके दुखणेअंगावर लाल डाग पडणेपोट अकडणे, भूक न लागणेमळमळ व ओकारी होणेरक्तपेशी कमी होणेकसा कराल बचाव झोपताना पूर्ण शरीरावर पांघरुण घ्यावेकुलर काढून पाणी साचू न देणेविद्यार्थ्यांत डेंग्यूविषयी जागृती करणेघर व कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणेआठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवणेपाण्याची टाकी नियमित साफ करणेखुल्या जागेत वा छतावर पाणी साचू न देणेडेंग्यूचे प्रकार डेंग्यूचे दोन प्रकार आहेत. यात हिमोरहेजिक डेंग्यू व शॉक डेंग्यू याचा समावेश आहे. वेळीच उपचार न झाल्यास हिमोरहेजिक डेंग्यू होण्याची अधिक शक्यता असते.यात दोन-तीन दिवस ताप राहतो. आतड्यात व हृदयात रक्तस्राव होतो. रक्तदाब कमी झाल्याने रुग्णाला धक्का बसून मृत्यू होण्याचा धोका असतो. अशी होते तपासणीडेंग्यूची लक्षणे आढळून आल्यास रक्त तपासणी करावी. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते. प्लेटलेट्स कमी झाल्यास आयजी-जी, आयजी-एन, एनएसटी एंटीजन आदी तपासण्या केल्या जातात. तसेच एलआयजी तपासणी केली जाते. मेयो रुग्णालयात उपचाराची सुविधा आहे.