शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते जोशी यांच्या मुलीला डेंग्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 10:50 IST

शहरात डासांचा प्रकोप वाढला असून, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशहरात वाढता प्रकोप नगरविकास राज्यमंत्री पाटील आज बैठक घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात डासांचा प्रकोप वाढला असून, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती आहे. नागपुरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाविषयी माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक आयोजित केली आहे.डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाला अपयश आले आहे. राज्य सरकारला यात हस्तक्षेप करावा लागत आहे. संदीप जोशी यांची मुलगी मानसी बीआरए मुंडले शाळेत इयत्ता आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहे. त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅडमिंटनचा सराव करण्यासाठी जाते. सोमवारी मानसी हिला ताप आला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुासर लक्ष्मीनगर येथील धु्रव पॅथालॉजीत मानसी हिची एनएस १ अ‍ेंटीजन टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जोशी शहराबाहेर होते. नागपुरात आल्यानंतर त्यांनी याची सूचना महापालिके च्या मलेरिया-फायलेरिया विभागाला स्वत: दिली. इतर विद्यार्थ्यांना डेंग्यू होऊ नये, याकरिता डासांवर नियंत्रणासाठी त्यांनी मानसी सरावासाठी जात असलेल्या ठिकाणांची व शाळा परिसराची तपासणी करण्याचे निर्देश दिले. मानसी बॅडमिंटन खेळाडू आहे. ती सहा-सात तास दररोज सराव करते. यासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे डेंग्यूचे डास नेमके कोणत्या परिसरात आहेत, हे सांगता येणार नाही. विभागाला याची सूचना दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. यावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले आहे. राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठक आयोजित केली आहे.

अधिकारी फ ोन उचलत नाहीमलेरिया-फायलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या खासगी सचिवांनी अनेकदा फोन केले. परंतु थोटे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सचिवाने याची माहिती संदीप जोशी यांना दिली. त्यानंतर जोशी यांनी स्वत: फोन करून त्यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर थोटे यांनी अलइजा टेस्ट करण्याचा सल्ला दिला.

डेंग्यूच्या संशयितांची संख्या वाढलीगेल्या काही महिन्यांत शहरातील डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या १३४८ पर्यंत पोहचली आहे. यातील १०५ पॉझिटीव्ह असल्याला पुष्टी मिळाली आहे. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. डेंग्यूचे डास शुद्ध पाण्यात असतात. मलेरिया-फायलेरिया विभागाला यावर नियंत्रण घालण्यात यश मिळालेले नाही.

टॅग्स :dengueडेंग्यू