शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

चार हजारावर घरात डेंग्यू डासांच्या अळ्या

By admin | Updated: September 12, 2014 00:52 IST

डेंग्यूच्या रोगाने नागपूरकर बेजार झाले असून, आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे चित्र आहे.

नागपूरकर त्रस्त : हनुमाननगर झोनमध्ये जास्त डासनागपूर : डेंग्यूच्या रोगाने नागपूरकर बेजार झाले असून, आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीपायरोग विभागाने आॅगस्ट महिन्यात १ लाख ५५ हजार ७२७ घरांची झाडाझडती घेतली यात तब्बल ४ हजार ६९८ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, डेंग्यूचा ‘एडीस इजिप्त‘ नावाचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. यामुळे लवकरच यावर उपाययोजना न झाल्यास शहरात याचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात अहे. शहरात डेंग्यू, मलेरिया व टायफाईड या आजारांची साथ पसरली आहे. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्यामुळे त्याची पैदास झपाट्याने होऊन रुग्ण संख्या वाढत आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी हिवताप व हत्तीरोगाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. या विभागाच्यावतीने मागील महिन्यात १लाख ५५ हजार ७२७ घरांची झाडाझडती घेण्यात आली. यात झोपडपट्टी परिसरासोबतच पॉश वसाहतीतील घरे डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनल्याचे दिसून आले. यातील ४ हजार ६९८ घरांंमधील कुलर्स, घरांच्या टीनावर टाकलेली टायर आणि उघड्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. यात मनपाच्या हनुमाननगर झोनमधील सर्वात जास्त १७२२ घरे या डासांच्या उत्त्पत्तीचे केंद्र असल्याचे तपासणीत समोर आले. विभागाच्यावतीने या झोनमधील २१ हजारावर घराची झडती घेण्यात आली होती. या झोनच्या खालोखाल लकडगंज झोनमध्ये १६ हजार ४६७ घरांची झडती केली असता ६८४ घरांत, सतरंजीपुरा झोनमध्ये १३ हजार ९८७ घरांची झडती घेतली असता ४२६ घरांमध्ये तर गांधीबाग झोनमधील २१ हजार घरांची झडती घेतली असता ३४६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्या. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्व घरांमध्ये कीटनाशकांची फवारणी करून एक आठवड्याच्यावर पाणी साठवले जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.