शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

लोकशिक्षण केल्यास डेंग्यूवर नियंत्रण शक्य

By admin | Updated: October 23, 2014 00:29 IST

डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना के लेल्या आहेत. खबरदारी म्हणून काय करावे, याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत. दुर्दैवाने या सूचनांचे

समन्वय बैठक : प्रवीण दटके यांचे प्रतिपादन नागपूर : डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना के लेल्या आहेत. खबरदारी म्हणून काय करावे, याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत. दुर्दैवाने या सूचनांचे पालन होत नसल्याने लोकशिक्षणाशिवाय डेंग्यूवर नियंत्रण शक्य नसल्याचे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी केले. डेंग्यू आजाराची दखल घेत यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मनपाच्या केंद्रीय कार्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत दटके बोलत होते. महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात तापाच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होताच डेंग्यूचा रुग्ण आहे, असे समजून त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे शहरात डेंग्यूविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारापासून लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यामुळे शहरातील क ोणत्याही रुग्णालयात तापाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होताच त्या रु ग्णाचा सविस्तर डाटा मनपाला तातडीने द्यावा. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून मनपा रुग्णालयात हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. केबल नेटवर्क, सिनेमागृहे, फेसबुक, इंटरनेटच्या साह्याने व सोशल मीडियाच्या मदतीने डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपक्र म राबविण्याचे निर्देश दटके यांनी दिले.बैठकीत डेंग्यूचा झोननिहाय आढावा घेतला. शहरात डेंग्यूचे १७१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पथकामार्फ त शहरातील घरांना भेटी देण्याचे काम सुरू आहे. भेटीत ८४६९ घरे दूषित आढळून आली असून १०८६९ घरातील पाणीसाठ्यात डास, अळ्या आढळून आल्या. अबेट औषधी टाकून त्या नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आरोग्य समितीचे सभापती रमेश शिंगारे, उपसभापती साधना बरडे, अपर आयुक्त हेमंत कुमार पवार, उपायुक्त संजय काकडे, सहाय्यक संचालक(मलेरिया) डॉ. एम.बी.गणवीर, लता मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. डी.एस.राऊ त, बाल रोगतज्ज्ञ डॉ. राजीव मोहता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.बी.हेडाऊ , डॉ. संदीप खारकर, मेयो रुग्णालयाचे डॉ. दिलीप गेडाम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.कुश झुनझुनवाला, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)